Sania -Shoaib Malik : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया-शोएबची मोठी घोषणा | पुढारी

Sania -Shoaib Malik : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया-शोएबची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू  शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली आहे. यानंतर सानिया आणि शोएबने ( Sania -Shoaib Malik ) याबाबतची अधिकृत कोणतीच माहिती दिली नाही. परंतु, आता त्यांनी सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ( Sania -Shoaib Malik ) दोघेजण लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे रंगली होती; परंतु, सानिया किंवा शोएब दोघांनी याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती त्याच्या इंन्स्टाग्रामवर दिली नव्हती. सध्या घटस्फोटोच्या चर्चेदरम्यानच दोघांनी एक मोठी घोषणा केली आहे. यात त्यांनी नवीन शो घेवून येणार असल्याची माहिती दिली आहे.

उर्दूफ्लिक्स इंन्स्टाग्राम अकांऊटवर सानिया आणि शोएबचा एक फोटो शेअर करत दोघेजण आगामी ‘मिर्झा मलिक शो’ हा शो घेवून येणार असल्याची माहिती दिली आहे. हा शो पाकिस्तानात होणार असून, त्यासाठी दोघेजण लवकरच हजेरी लावणार आहेत. या शो बद्दलची माहिती मिळताच, चाहत्यांनी त्याच्यावर कॉमेन्टसचा पाऊस पाडत तर्क-वितर्क लावले आहेत. यात काही नेटकऱ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी ट्रोल करताना ‘टीआरपी वाढविण्यासाठी असे केले आहे काय?’ असे प्रश्न विचारले जात आहेत. तर सानिया सध्या पाकिस्तानात नसल्याने याआधीच शो शूट केला असावा, असेही म्हटलं आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा विवाह २०१० रोजी झाला होते. दरम्यान शोएबचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा ओमरशी जोडले गेले. यामुळे सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटोची चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button