केरळ: आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या दोन नेत्यांना अटक | पुढारी

केरळ: आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या दोन नेत्यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क: केरळमधील पलक्कड येथील आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्याप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय संघटनेच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे. आरएसएस कार्यकर्ते एसके श्रीनिवासन यांच्या हत्तेप्रकरणात केरळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरएसएस कार्यकर्ते एसके श्रीनिवासन यांची एप्रिल, २०२२ मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या हत्याप्रकरणी पीएफआयच्या कुलुकल्लुर क्षेत्राचे सचिव सेथली आणि यूनिटचे सदस्य रशिद या दोघांना केरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केरळमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले आहे की, या दोघांनी हत्या करताना वापरल्या गेलेली वाहने घटनास्थळावरून गायब करण्यासाठी गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी हत्येच्या तपासात गुंतलेल्या एका अधिकाऱ्याला देखिल जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याला आरोप अधिकाऱ्याने केला होता. एम अनिल कुमार यांनी म्हटले आहे की, शनिवारी रात्री त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि शवपेटी तयार ठेवण्यास सांगितले. त्यामुळे या हत्येप्रकरणी पोलिसांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्येचा कट रचनाल्याप्रकरणी अटक

याप्रकरणात यापूर्वी सप्टेंबरमध्ये पीएफआयचे पलक्कड जिल्हा सचिव अबुबकर सिद्दीक यांना आरएसएस नेत्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अबुबकर सिद्दीक हे भाजप, सीपीआय(एम) आणि आययूएमएल सारख्या राजकीय संघटनांच्या नेत्यांवर सूड हल्ल्याची योजना आखणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.

हे ही वाचा :

America President Election : डोनाल्ड ट्रम्प 2024 च्या अध्यक्षपदासाठी बोली जाहीर करणार, मिलर यांची माहिती

Nasal Cavity Cancer : डॉक्टरांची कमाल, हातावर नाक उगवून केले ट्रान्सप्लान्ट

Back to top button