Go Live Together : यू ट्युबर्ससाठी आनंदाची बातमी! यू ट्युबचे ‘हे’ जबरदस्त फिचर लवकरच… | पुढारी

Go Live Together : यू ट्युबर्ससाठी आनंदाची बातमी! यू ट्युबचे 'हे' जबरदस्त फिचर लवकरच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही यू ट्युबवर असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच. यू ट्युब नेहमी आपल्या युजर्ससाठी काही ना काही नवनवे फिचर आणत असते. यू ट्युबने आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवे (Go Live Together) फिचर (Youtube Feature) आणले आहे. हे यू ट्युबचं नवं फिचर वापरलात तर तुम्हाला नक्की फायदा होईल. जाणून घ्या, यु ट्यूबचं नवं फिचर कोणतं आहे कसं वापरायचं आणि तुम्हाला कसं उपयोगी पडणार आहे ते.

Go Live Together : यू ट्युबरसाठी खुशखबर

आपल्या आजुबाजुला पाहिले तर अनेक यू ट्युबर्स सहज सापडतील. मॉनिटायजेशनच्या माध्यमातून पैसे मिळतात आणि आपले स्किल दाखवण्यासाठी एक ओपन प्लॅटफॉर्म असल्याने यू ट्युबवर अनेक यू ट्युबर्स तयार झालेत. यू ट्युब हे आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणून व्हिडिओ बनवण्यात सुलभता आणण्याचा प्रयत्न करत असते. आता यू ट्युबने आणखी एक नवं फिचर आणलं आहे. जे यू ट्युब युजर्स यू ट्युब कंटेट क्रिएटर आहेत. त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. जे यू ट्युबर लाईव्ह व्हिडिओ करतात त्यांच्यासाठी हे नवं फिचर फायदेशीर आहे. तुम्ही जर यू ट्युबवर लाईव्ह करत असाल तर या नव्या फिचरमुळे तुम्ही तुमच्या गेस्टलाही तुमच्या लाईव्हमध्ये घेऊ शकता. (Invite) या नव्या फिचरचं नाव हे ‘लाईव्ह टुगेदर’ (Live Togather) असं आहे.

या बाबत यू ट्युबने आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. आपल्या ब्लॉगमध्ये यू ट्युबने म्हंटलं आहे की, हे नवं फिचर काही निवडक यू ट्युब क्रिएटरसाठी असेल. काही दिवसांनी हे सर्वांसाठी उपलब्ध होईल. सध्या हे स्मार्टफोनधारकांसाठी असून लवकरचं ते डेस्कटॉपसाठीही उपलब्ध होईल. या नव्या फिचरमुळे तुम्ही यू ट्युब लाईव्हमध्ये फक्त एकाला तुम्ही इनव्हायट करु शकता. त्याचबरोबर हे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही शेड्यूल्डही करू शकता.

असं वापरा हे नवं फिचर

१. प्रथम आपल्या एंड्राईड स्मार्टफोनवर यू ट्युब ओपन करा
२. क्रिएट+ गो लाईव्हवर टॅप करा
३. लाईव्ह स्ट्रिमिंग संबंधित माहिती भरा. उदा. थंबनेल, विषय, कोण पाहू शकतात लाईव्ह स्ट्रिमिंग आदी
४. ओके (ok) केल्यानंतर तुम्ही लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये तुमच्या गेस्टला इन्व्हायट करु शकता

हेही वाचा

Back to top button