IND vs ENG Semi Final : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? सेमी फायनलमध्ये कोणाला संधी; रोहित शर्माने दिले उत्तर | पुढारी

IND vs ENG Semi Final : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? सेमी फायनलमध्ये कोणाला संधी; रोहित शर्माने दिले उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकातील दुसरा सेमी फायनल सामना भारत वि. इंग्लंडमध्ये ॲडलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना गुरुवारी (दि.१०) खेळवला जाईल. दरम्यान या सेमी फायनल सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. सेमी फायनलमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे रोहित शर्माने सांगितले. रोहित शर्मा म्हणाला, विश्वचषकात आम्ही ज्या उद्देशाने उतरलो, ते साध्य करण्याची संधी आमच्याकडे चालून आली आहे. आम्ही या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीत सातत्य ठेवण्याची गरज आहे. बाद फेरीतील सामने आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत. (IND vs ENG Semi Final)

बाद फेरीत चांगली कामगिरी करणे महत्वपूर्ण

बाद फेरीत चांगली कामगिरी करणे महत्वपूर्ण आहे. संघातील सर्व खेळाडूंना आपण भारतीय संघासाठी खेळत आहोत, याचा गर्व असायला हवा. उद्या (दि.१०) इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. बाद फेरीत चांगली कामगिरी केल्यास संघाचा आत्मविश्वास वाढतो, असे रोहित शर्मा यावेळी बोलताना म्हणाला. (IND vs ENG Semi Final)

पंत की कार्तिक (IND vs ENG Semi Final)

ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक पैकी अंतिम ११ मध्ये कोणाला संधी मिळणार? याचे उत्तर कर्णधार रोहित शर्माने दिले आहे. रोहित म्हणाला, झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला माहिती नव्हते, की सेमी फायनल सामना कोणाविरूद्ध असेल. ऋषभ पंतने सराव सामन्यांशिवाय कोणतेही सामने खेळले नव्हते. अशा स्थितीत आम्हाला त्याला एका सामन्यात संधी द्यायची होती. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी ऋषभला संधी देण्यात आली होती. सेमी फायनल सामन्यासाठी दोन्ही यष्टीरक्षक उपलब्ध असणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय उद्या घेण्यात येईल, असे रोहित म्हणाला आहे. (IND vs ENG Semi Final)

हेही वाचलंत का?

Back to top button