वादग्रस्त विधानानंतर अब्दुल सत्तार म्हणाले, “मी सॉरी…” | पुढारी

वादग्रस्त विधानानंतर अब्दुल सत्तार म्हणाले, "मी सॉरी..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : वादग्रस्त विधानानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, “मी राज्‍यातील काेणत्‍याही महिलेचा अपमान केलेला नाही. राजकारणामध्‍ये टीका हाेतच असते. यातूनच मी बाेललाो. माझ्‍या विधानामुळे अवमान झाला असे वाटत असेल तर मी सारी.”

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. राजकीय वतुर्ळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) माध्यमांशी बोलताना सुप्रियाताई सुळे यांच्या बदद्ल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरुन सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमोल मिटकरींनी दिला होता इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार  (Abdul Sattar) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “आम्हालाही बोलता येत पण, आम्ही तसं बोलणार नाही. माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात फिरणे अवघड करु. असे म्हणाले. राष्ट्रवादीकडून त्यांना शब्द मागे घेण्यासाठी २४ अल्टीमेटस देण्यात आला आहे. ट्विट करतही त्यांनी संताप व्यक्त केले आहे. “अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही .आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अप शब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या .नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल.”

रोहीत पवारांनी केला होता निषेध

आमदार रोहीत पवार यांनीही ट्विट करत अब्दुल सत्तार  (Abdul Sattar) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध वक्तव्य केला आहे,”

कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही.महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?

सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक ‘बदला’ घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात.आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या.”

हेही वाचा

Back to top button