Anushka Shetty Birthday : अनुष्का शेट्टीनं प्रभाससाठी तोडलं स्‍वत:चं लग्न, हे होतं मोठं कारण.. | पुढारी

Anushka Shetty Birthday : अनुष्का शेट्टीनं प्रभाससाठी तोडलं स्‍वत:चं लग्न, हे होतं मोठं कारण..

पुढारी ऑनलाईन : Anushka Shetty Birthday- दक्षिण चित्रपट सृष्‍टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्‍का शेट्टी हिचे जगभर लाखो चाहते आहेत. अनुष्‍का शेट्टी हिनं म्‍हटलं की, एस एस राजामौली यांच्या ब्‍लॉकबस्‍टर ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ चित्रपटातील तिचा दमदार अभिनय आपल्‍या नजरेसमोर येतो. या चित्रपटातील देवसेना या पात्राला पाहिल्‍यानंतर सर्वांच्या तोंडून एकच वाक्‍य येत, ते म्‍हणजे हे पात्र अनुष्‍का इतक दुसर कोणीही अधिक चांगल वठवू शकत नाही. ‘बाहुबली’ ची देवसेना म्‍हणजेच अनुष्‍का शेट्टी हिचा आज ४१ वा वाढदिवस आहे. ७ नोव्हेंबर १९८१ रोजी मंगळूरमध्ये जन्मलेल्‍या अनुष्‍काने मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनुष्‍काला तमिळ आणि तेलुगू चित्रपटांची क्‍वीन समजले जाते. करिअर सोबतच अनुष्‍का ही तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. तीच नाव दुसऱ्या कोणाशी नाही तर ‘बाहुबली’ फेम प्रभासशी जोडल जातं. असही म्‍हटलं जातं की, प्रभासने अनुष्‍काच ठरलेलं लग्‍न थांबवल होत. चला तर आज जाणून घेवुयात अनुष्का शेट्टी आणि प्रभासचा हा किस्सा…

‘बाहुबली’ चित्रपटातील प्रभास आणि अनुष्‍काची केमिस्‍ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. Anushka Shetty Birthday या चित्रपटानंतर ही जोडी माध्यमांच्या आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. प्रभास आणि अनुष्‍काचा ऑनस्‍क्रिन रोमान्स पाहिल्‍यानंतर सगळीकडे त्‍यांच्या अफेअरच्या बातम्‍या होत्‍या. त्‍यामुळे अनेकांकडून असा दावा केला जात होता की, अनुष्‍का शेट्टी आणि प्रभास यांच्यात अफेअर आहे. या बातम्‍या पसरण्यालाही प्रभासच जबाबदार होता कारण प्रभासने अनुष्‍काचे लग्‍न रोखले होते. बाहुबली चित्रपटाच्या शुटींग दरम्‍यान अनुष्‍काचे लग्‍न ठरले होते. मात्र प्रभासने हे लग्‍न रोखले होते. या पाठिमागे एक मोठे कारण होते.

प्रभासने अनुष्‍काचे Anushka Shetty Birthday ठरलेले लग्‍न थांबवण्याचे पाउल उचलले. या पाठीमागे प्रेम नव्हते तर प्रोफेशनल कारण होते. त्‍याच झालं असं की, प्रभासने बाहुबली चित्रपटासाठी तीन वर्षे कोणतेही चित्रपट स्‍वीकारले नव्हते. या चित्रपटासाठी त्‍याने खूप कष्‍ट घेतले होते. त्‍यामुळे प्रभासला वाटत होते अनुष्‍कानेही या प्रोजेक्‍टवर लक्ष केंद्रीत करावे. जर अनुष्‍का लग्‍नात गुंतून पडली तर तिचे ‘बाहुबली’ चित्रपटावरील लक्ष विचलीत होईल यामुळे याचा परिणाम चित्रपटातील तीच्या अभिनयावर होईल. त्‍यामुळे प्रभासने अनुष्‍काचे ठरलेले लग्‍न मोडले.


‘बाहुबली’ चित्रपटातील या दोघांचे बॉन्डिंग आणि केमिस्‍ट्री चांगलीच जमली होती. हे या चित्रपटातील दोघांच्या अभिनयावरून दिसून येते. त्‍यातच अशा बातम्‍याही येत होत्‍या की, प्रभास आणि अनुष्‍का हे एकमेकांना पसंद करतात आणि ते दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र अनेक कार्यक्रमात या दोघांनी आम्‍ही दोघे केवळ चांगले मित्र आहोत आणि नेहमीच राहू म्‍हणत या लग्‍नाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्‍न केला होता.

हेही वाचा :  

Back to top button