Healthy Diwali : वजन न वाढवता बिनधास्त फराळ खाण्यासाठी 'या' खास टिप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : दसरा झाला की, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत दिवाळीचे वेध लागतात. दिव्यांचा सण अशी ओळख असलेल्या या सणावेळी सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी म्हटलं की फटाके, फराळ आणि पाहुण्यांच्या गाठीभेटी होत राहतात. थोडक्यात नाती दृढ करणारा हा सण असतो. दिवाळी आणि फराळ असं समीकरणच बनलं आहे. या फराळात तुम्हाला बरेच गोडधोड आणि तेलकट (Healthy Diwali) पदार्थ पाहायला मिळतात. थोडक्यात पदार्थांची रेलचेल असते. पण या पदार्थांमुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या टिप्स नक्की तुम्हाला मदत करतील.
चैत्यनाचा, आनंदाचा, उत्साहाचा हा दिवाळी सण मानवी संबध वृद्धींगत करत आला आहे. दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. फराळात गोडधोड आलचं. आपला फराळ आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना, आपल्या शेजाऱ्यांना देण आलं. त्यांचा फराळ आपल्या घरी पाठवण हेही आलं. खाण्यासाठी आग्रहही आला. या दिवसात थोडंफार आपल्या शरीराकडे दुर्लक्ष (Healthy Diwali) होतचं राहतं. वजन वाढत जातं. पण आपलं वजन वाढत तर नाही ना हेही पाहायला हवं. तुम्हाला वजनही वाढवायचं नाही आहे आणि फराळही खायचा आहे तर काही साध्या साध्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही फराळाचा नक्कीच आस्वाद घ्याल.
Healthy Diwali : पौष्टिक आणि सकस खा
दिवाळीत समोर फराळाचे पदार्थ आहेत म्हणून काहीही खाऊ नका. जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि पौष्टिक आहे त्यावर भर द्या. दिसेल ते खात सुटला तर नक्कीच तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार. त्याचबरोबर तुमचं वजन वाढायला सुरुवात होईल, हे निश्चित. जर वजन वाढवायचं नसेल तर पौष्टिक आणि सकस आहारावर भर द्या.
आग्रहाला बळी पडू नका
दिवाळी सणात पाहुण्यांच, शेजाऱ्यांच, मित्र-मैत्रिणींच आपल्या घरी येणजाणं होतं. तर आपलं त्यांच्याही घरी जाणं होतं. पाहुणचार म्हणून फराळ देतो. यावेळी आग्रह हा होणारचं. पण आग्रह होतोय आणि समोरच्या व्यक्तीचं मन कस मोडायचं असं वाटत असेल तर थोड थांबा आणि आपल्या आरोग्याचा विचार काराच आणि तुम्हाला तुमचं वजन कमी करायचा याचा पण विचार करा आणि थोडचं खा. जेणेकरुन समोरच्या व्यक्तीचा आदरही राखला जाईल आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.
पुरेसं पाणी प्या
दिवाळीच्या दरम्यान हिवाळ्याला सुरुवात होते. थंडी लागायला सुरुवात होते. त्वचेवर परिणाम होतो. रुक्ष त्वचा व्हायला सुरुवात होते. थंडीमूळे तहान लागत नाही. पाण्याच प्रमाण कमी होत. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पण जर तुम्ही पाणी शरिराला आवश्यक आहे तेवढं पिलं तर वारंवार खाण्याची इच्छा कमी होईल. गोड खाण्याचं प्रमाण कमी होईल. कमी खाल्ल की वजनवाढीचा धोकाही कमी होईल.
नियमितपणे चालायला जा
दिवाळीच्या दिवसात आपली धावपळ होत असते. पाहुण्यांची येजा, पदार्थ बनवणं, सण साजरा करणे यात आपलं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यात गोडधोड आणि तेलकट खाण्याचेही प्रमाण आपलं वाढत असतं. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत राहतो. जर का तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित करायच असेल, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही दरदरोज चालायला जा.
प्रोटीन खाण्यावर भर द्या
प्रोटीन खाल्याने वारंवार भूक लागण्याची इच्छा कमी होते. दिवाळी काळात प्रोटीन्स खाण्यावर भर द्या. जेणेकरुन तुम्हाला सतत खायची इच्छा होणार नाही,. परिणामी तुमच्याकडून या दिवसात गोडधोड आणि तेलकट खाण्याचे प्रमाण कमी असेल व तुमचं वजन संतुलित राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
जर का तुम्हाला दिवाळी फराळ खायचा आहे. पण वजनही वाढवायचं नसेल तर वर दिलेल्या सुचनांचे पालनं करा. तुमची फराळ खाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि वजन वाढण्याची भितीही राहणार नाही.
हेही वाचलंत का?
- Walking for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज नेमकं किती पावले चालावे? जाणून घ्या नवीन संशोधनातील माहिती
- Diabetes diet : मधुमेह रुग्णांनी वजन कमी कसे करावे? आहाराबाबत घ्या ‘ही’ काळजी
- Weight & Fitness: केवळ अधिक खाण्यानेच नाही, तर ‘या’ कारणांमुळेही वाढते वजन