Jakarta Mosque: जकार्तामध्ये भीषण आगीत मशीद जमीनदोस्त (पाहा व्हिडिओ) | पुढारी

Jakarta Mosque: जकार्तामध्ये भीषण आगीत मशीद जमीनदोस्त (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन: इंडोनेशियातील जकार्ता (Jakarta Mosque )येथील इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदीचा मोठा घुमट बुधवारी भीषण आगीमुळे कोसळला. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हा घुमट कोसळताना दिसत आहे. मशीद कोसळण्याच्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गल्फ टुडेच्या वृत्तानुसार, (Jakarta Mosque ) मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान आग लागल्याने घुमट कोसळला. स्थानिक वेळेनुसार काल दुपारी 3 वाजता आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली, किमान दहा अग्निशमन दल पाठवण्यात आले. मात्र, आग विझवता आली नाही, असे इंडोनेशियातील माध्यमांनी सांगितले आहे.

(Jakarta Mosque ) व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मशीद कोसळण्यापूर्वीच्या घुमटातून ज्वाळा आणि धूर निघताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यावेळी इस्लामिक सेंटरमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते, असे स्थानिक मीडियाने सांगितले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आगीच्या कारणाचा तपास करत असून, इमारतीत काम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी सुरू आहे. इस्लामिक सेंटर कॉम्प्लेक्समध्ये मशिदीव्यतिरिक्त शैक्षणिक, व्यावसायिक आणि संशोधन सुविधाही आहेत. २० वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या वेळी मशिदीच्या घुमटाला आग लागली होती. ती आग विझवण्यासाठी पाच तास लागले.

हेही वाचा:

Back to top button