रायगड : शिवराज्‍याभिषेक दिन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवराज्‍याभिषेक दिन
शिवराज्‍याभिषेक दिन

रायगड : पुढारी ऑनलाईन छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री, आमदार, खासदार या सोहळ्याला उपस्‍थित हाेते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्‍त रायगडावर दाखल झाले हाेते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला आज (शुक्रवार) सकाळी साडेआठ वाजता किल्ले रायगडावर सुरूवात झाली. येथे उभारलेल्या राजदरबारात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

आजच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा उदयनराजे भोसले, चंद्रकांत पाटील , सुधीर मुनगंटीवार ,पालकमंत्री उदय सामंत , दादा भुसे , गिरीश महाजन ,आ दीपक केसरकर आ सुर्वे ,आ प्रवीण दरेकर ,आ प्रशात ठाकूर ,आ अनिकेत तटकरे , खा डॉ श्रीकांत शिंदे , खा श्रीरंग बारणे ,खा सुनील तटकरे आदी उपस्थित हाेते. गडावरील हा सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त कालपासूनच गडावर दाखल झाले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news