सांगलीत दै. पुढारीतर्फे एज्यु दिशा प्रदर्शन आजपासून सुरु; शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने | पुढारी

सांगलीत दै. पुढारीतर्फे एज्यु दिशा प्रदर्शन आजपासून सुरु; शिक्षणतज्ज्ञांची व्याख्याने

सांगली : पुढारी वृत्तसेवा दहावी आणि बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे, या गोंधळात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहे एक सुवर्णसंधी, आजपासून दैनिक पुढारी एज्यु दिशा हे तीन दिवसांचे प्रदर्शन सांगलीत कच्छी समाज भवन, (राममंदिर चौक) येथे सुरू होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून करिअरच्या संधी आणि विविध अभ्यासक्रम देणाच्या संस्थांची माहिती एकाच छताखाली मिळणारआहे. राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार असून त्यांची माहिती इथे छताखाली मिळणार आहे. यामुळेच संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै. पुढारी एज्यु दिशा विद्याथ्र्यांच्या भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक प्रदर्शन खूप महत्वाचे ठरणार आहे.
संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत. प्रा. मोटेगावकर यांचे आरसीसी है पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. एमआयटी / एडीटी युनिव्हर्सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे सहयोगी प्रायोजक आहेत. अशोकराव माने ग्रुप अंबप आणि चाटे शिक्षण समूह सहप्रायोजक आहेत. अधिक माहितीसाठी परितोष (९७६६२१३००३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आज उद्घाटन…

प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते व महापालिका आयुक्त सुनील पवार, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. अरुण पाटील, प्रा. मोटेगावसरांचे आरसीसी लातूरचे प्रमोद घुगे, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, मानेट, पुणेचे एचओडी प्रा. सुनील चवळे, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे प्रा. स्वप्नील सोनकांबळे, अशोकराव माने ग्रुपचे प्राचार्य डॉ. सचिन पाटील आणि चाटे शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्रा. सर्जेराव राऊत यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

Back to top button