नवरात्रीच्या उपवासातील रताळूला ५ कोटी ७० लाख वर्षांचा इतिहास (Sweet Potatoes India Origin)
नवरात्रीच्या उपवासातील रताळूला ५ कोटी ७० लाख वर्षांचा इतिहास

पुढारी ऑनलाईन : नवरात्रीच्या उपवासातील एक महत्त्वाचे कंद म्हणजे रताळू. उकडलेले रताळे, पुरण पोळ्या अशा विविध प्रकारे रताळू नवरात्रीच्या उपवासात मदतीला येतात. रताळू पौष्टिकही आहेत. या रताळूचा नेमका उगम कुठला हा प्रश्न अनेकांना पडतो. बऱ्याच जणांचा समज असा आहे की रताळूचं मूळ हे अमेरिकेत आहेत, पण नवीन संशोधनाने रताळू हा भारतीय असल्याचे सिद्ध केले आहे. आणि वैशिष्ट्यं म्हणजे या रताळूची सर्वांत जुनी नोंद ही तब्बल ५ कोटी ७० लाख वर्ष इतकी जुनी आढळली आहे. (Sweet Potatoes India Origin)
आशिया खंड जेव्हा गोंडवाना भूमीचा भाग होता, तेव्हाचा हा पुरावा आहे. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या संदर्भातील संशोधन केले आहे. संशोधक डेव्हिड डिल्चर आणि काही भारतीय संशोधकांना पूर्व भारतात काही वनस्पतींच्या पानांचे जीवाश्म मिळाले होते. हे जीवाश्म रताळूच्या कुळातील वनस्पतींचे असल्याचे आढळून आले. अमेरिकेतील या कुळातील वनस्पतींच्या जीवाश्मांची नोंद ही ३ कोटी ५० लाख वर्षं इतकी जुनी आहे. पण आपण आता ज्या स्वरूपात रताळू पाहातो, त्याच स्वरूपात त्या काळात होते का, याबद्दल मात्र संशोधकांनी माहिती दिलेली नाही.
अर्थात काहीही असले तरी रताळू हे महत्त्वाचे कंदमूळ आहे. रताळूचे पीक घेण्यासाठी सोपे असल्याने जगभरात रताळूचे पीक घेतले जाते. यापूर्वीचे जे संशोधन झाले आहे, ते रताळूची नोंद ही अमेरिकेतील असल्याचे म्हटले आहे. ख्रिस्तपूर्व २५०० ते १८५०मध्ये रताळूची लागवड अमेरिकेत झाली. ख्रिस्तोपर कोलंबसने रताळू स्पेनमध्ये नेले. सुरुवातीला रताळूला पोटॅटो म्हणण्याची पद्धत होती. १७४०मध्ये रताळूसाठी स्वीट पोटॅटो हा शब्द रुढ झाला.
हेही वाचा
- Food : मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’
- झटपट हेल्दी टिफिन, ब्रेकफास्ट रेसिपीज्
- आजची रेसिपी : स्पेशल ‘रगडा’