आजची रेसिपी : स्पेशल ‘रगडा’ | पुढारी

आजची रेसिपी : स्पेशल ‘रगडा’

पुढारी ऑनलाईन टीम 

थंडीच्या दिवसात चमचमीत काहीतरी खावेसे वाटते. बाहेर जाऊन जिभेचे चोचले पुरवणे महागात पडू शकते. आरोग्यासाठीही सतत बाहेरील पदार्थ खाणे अपायकारक ठरते. यामूळे बिघडण्याचे चान्सेस असतात. म्हणूनच घरच्या घरी बनवा जिभेचे चव बदलणारा ‘स्पेशल‘ रगडा. smiley

‘स्पेशल‘ रगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

उकडलेले बटाटे, वाटाणे 

हिरव्या मिरच्या,  लसूण, आले, जिरे 

बारीक शेव, हिरवी आणि आंबटगोड चटणी.

मीठ, हळद, तिखट 

कृती 

सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजवावेत. सकाळी ते शिजवून घ्यावेत. शिजवताना त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे थोडे तिखट घालावे. वटाणे चांगले गीर शिजवून घ्यावी. 

बटाटे उकडून घ्यावेत. ते सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. 

हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावे. नंतर तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून फ्राय करावेत. 

सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटिस घेऊन त्यावर रगडा घालावा. त्यावर शेव व आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात.

रगडा कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही पुऱ्यांचा चूराही त्यात घालू शकता. 

Back to top button