Life Style : तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येतात का? मग ‘या’ वस्तू घरातून हद्दपार करा… | पुढारी

Life Style : तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येतात का? मग 'या' वस्तू घरातून हद्दपार करा...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style तुम्हाला कायम काही ना काही कारणास्तव आर्थिक अडचणी येतात का? किती ही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो का? आलेला पैसा या ना त्या मार्गाने कायम निघून जातो का? हातात पैसा टिकत नाही अशी तुमची अवस्था आहे का? जर तुमच्या आयुष्यात हे सर्व होत असेल आणि तुम्हाला यामुळे सतत तणाव येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ही बातमी बारकाईने वाचा कारण तुमच्या या अडचणींवर हे उपाय प्रभावी असू शकतात…

वास्तू तज्ज्ञांचे असे मत आहे, Life Style तुम्हाला येणा-या सर्व समस्यांचे उत्तर तुमच्या घरात असते. जिथे तुम्ही राहाता ती जागा तुमच्या प्रगतीमध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे वास्तू तज्ज्ञ सांगतात तुमच्या जन्मानुसार तुम्हाला शुभ असणा-या दिशांप्रमाणे तुमच्या घराचे बांधकाम असावे. जेणेकरून उर्जेचा प्रवाह तुमच्या शरीरातील उर्जेशी मॅच होतो. आणि हा प्रवाह मॅच झाला तर तुमची सर्व कार्ये सकारात्मक दिशेने होतात.

Life Style : तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते का? हे असू शकते कारण…

Life Style असे असले तरी अनेक जणांना अगदी वास्तू शास्त्राप्रमाणे घराचे बांधकाम करूनही अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. इथे त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अनेकदा तुम्ही तुमच्या घरात अशा वस्तू ठेवता जी तुमच्या घरातील मुक्त सकारात्मक प्रवाहाला अडथळा ठरतात. परिणामी या वस्तूंमुळे सुद्धा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष करून आर्थिक अडचणी…. तर या काही 10 वस्तू किंवा गोष्टी अशा आहेत ज्या कधीही घरात ठेवता कामा नये…

Life Style अडगळ – भंगार – अनेकांना घरात भंगार जमा करायची सवय असते. मात्र, तुम्हाला माहित आहे का घरात भंगार जमा केल्याने ते आर्थिक दृष्टीकोनातून कधीही चांगले नसते. भंगार जमा करावयाचे असल्यास त्याला अतिशय विशिष्ट अशी स्वतंत्र जागा असायला हवी. अन्यथा दीर्घ काळ भंगार साचवू नये.

तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान : कोणत्याही प्रकारचे जुने तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान घरात जमा करून ठेवल्याने हे इलेक्ट्रॉनिक सामान तुमच्या घरात उर्जेचा प्रवाह खेचून घेते. परिणामी तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

फुटक्या वस्तू – घरात कधीही कोणत्याही प्रकारच्या फुटलेल्या वस्तू, जसे की बांगड्या, आरशाच्या काचा, फुटलेले आरसे, फुटलेली भांडी ही कधीही वापरू नये. यामुळे वास्तू दोष उत्तन्न होतात. तसेच समृद्धी येण्यासाठी या गोष्टी अडथळा ठरतो. एखादी वस्तू पुन्हा चिकटवून वापरण्याजोगी असेल तर ताबडतोब ते चिकटवावे. मात्र, अशा वस्तू दीर्घकाळ वापरू नये.

कपाटाची तुटलेली काच – तुमच्या घरातील कपाटाची काच फुटली असेल किंवा तुमच्या तिजोरीला कोणत्याही प्रकारच्या भेगा अथवा थोडे जरी तुटले असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घ्या. कारण तुटलेली तिजोरी, किंवा तुटलेल्या आरशामुळे पैशांचा प्रवाह बाहेर जातो. परिणामी तुम्ही कितीही कमावलेला पैसा हा तुमच्या हातात टिकत नाही. तो या ना त्या मार्गाने खर्च होतो.

Life Style : घरच्या घरी बनवा केस धुण्यासाठी ‘नैसर्गिक शाम्पू’! केस होतील मोरपिसा सारखे मुलायम

Life Style तुटलेली भेगा पडलेली पर्स – तुटलेली किंवा भेगा पडलेली पर्स कधीही वापरू नये. यामुळे तुमच्याकडे पैसे येत नाही. तसेच पैशांच्या पर्समध्ये कधीही किल्ली किंवा अन्य कोणत्याही वस्तू ठेवू नये.

देवी देवतांच्या खंडित मूर्ति किंवा चित्र – देवी देवतांच्या खंडित मूर्ति किंवा चित्र कधीही घरात ठेवू नये. तसेच देवी देवतांच्या चित्राचा वापर घर सजावटीसाठी करू नये. अन्यथा मोठी आर्थिक हानी होऊ शकते. तसेच निर्माल्य देखिल घरात ठेवू नये त्याचे ताबडतोब विसर्जन करावे. तुम्ही घरात लिंबू-मिरची किंवा आणि काळा बिबा वापरत असाल तर तो देखिल दर आठवड्याला नियमित पणे बदलावा. जुना झालेला घरापासून दूर नेऊन टाकावा.

Life Style हे चित्र लावू नये – घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदण्यासाठी कधीही महाभारताच्या युद्धाचे चित्र लावू नये. तसेच नटराज ची मूर्ति किंवा चित्र तसेच बुडत्या जहाजाचे चित्र लावू नये. त्याचप्रमाणे देवी देवतांच्या उग्र स्वरुपाच्या प्रतिमा कधीही घरात नसाव्या. किंवा जंगली हिंस्त्र पशू जसे की वाघ सिंह यांचेही चित्र घरात लावू नये. घरात कायम सुख-समृद्धीने भरलेले चित्र लावावे.

हे ही वाचा :

Life Style : घरच्या घरी बनवा केस धुण्यासाठी ‘नैसर्गिक शाम्पू’! केस होतील मोरपिसा सारखे मुलायम

Back to top button