Life Style : घरच्या घरी बनवा केस धुण्यासाठी ‘नैसर्गिक शाम्पू’! केस होतील मोरपिसा सारखे मुलायम | पुढारी

Life Style : घरच्या घरी बनवा केस धुण्यासाठी 'नैसर्गिक शाम्पू'! केस होतील मोरपिसा सारखे मुलायम

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style केस म्हणजे आपल्या डोक्यावरचा ताज असतो. केसांकडे शरीराच्या आत्मसन्मानाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. केसांच्या आरोग्यावर तुमच्या चेह-याच्या, त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य अवलंबून असते. केसांची स्टाइल Life Style तुमच्या चेह-याचा संपूर्ण लूक ठरवत असते. त्यामुळे सुंदर केस प्रत्येकालाच हवे-हवेसे वाटतात. सुंदर केसांसाठी त्यांची निगा राखणेही तितकेच महत्वाचे असते.

कोंड्याची समस्या? उपाय काय? | पुढारी

केसांची निगा राखण्यासाठी काळाप्रमाणे Life Style अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग स्थानिक उपलब्धतेप्रमाणे करण्यात आला. पण आता आधुनिक काळात मात्र जीवन गतिमान झाले आणि जुन्या चांगल्या गोष्टीदेखील करणे शक्य होत नसल्याने मागे पडत गेल्या. त्यांची जागा पहिले साबुण नंतर शाम्पू आणि कंडिशनरने घेतली आणि आता तर संपूर्ण हेअर स्पा तंत्रज्ञान आले आहे. तसेच चित्रपटांच्या प्रभावामुळे अनेकांना तेल लावलेले चपकू-चपकू केस नको असतात. तर वा-यावर भूरूभूरु उडणारे तरीही मुलायम राहणारे केस सर्वांनाच हवे-हवेसे वाटतात. पण केसांच्या आरोग्यासाठी तेलाने चप्पी केल्याशिवाय पर्यायही नसतो. म्हणून 99 टक्के लोक आदल्या रात्री तेल लावून दुस-या दिवशी शाम्पू कंडिशनरने केस धुतात.

Life Style आज अनेक प्रकारच्या अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की कोणताही शाम्पू आणि कंडिशनर केमिकलशिवाय तयार होत नाही. आणि शाम्पू कंडिशनरने केस धुणे केसांसाठी हानिकारक असते. मात्र, अनेक वेळा वेळेअभावी, पारंपारिक पद्धतीने केस धुणे शक्य नसते. म्हणून लोक शाम्पूचा अति प्रमाणात वापर करतात. परिणामी त्याचा केसांवर विपरित परिणाम होतो. केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केसांचा पोत बिघडणे. केसांना खवडे लागणे अन्य आजार जडतात. यामध्ये केस गळणे, पातळ होणे ही सगळ्यात मोठी तक्रार जवळपास सगळ्यांचीच असते.

यावर अनेकानेक प्रकारचे हर्बल शाम्पू किंवा तेल किंवा औषधे मार्केटमध्ये उपलब्ध असतात. असे असूनही अनेकांना याचा उपयोग होत नाही. किंवा गुण येत नाही. इतकेच काय तर आयुर्वेदिक शाम्पू, हर्बल शाम्पूमध्ये देखिल अल्प प्रमाणात केमिकल असतेच. त्यामुळे केसांची निगा कशी राखावी, आजच्या आधुनिक युगात झटपट केस धुण्यासाठी शाम्पू व्यतिरिक्त आणखी काही पर्याय आहे का? याचा शोध सगळेच जण घेत असतात. तर आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कोणत्याही केमिकलशिवाय केस धुण्यासाठी शाम्पू कसा तयार करावा याची प्रक्रिया सांगत आहोत. एकदा घरी हा शाम्पू बनवून याने केस धुवून पाहाच.

त्वचा आणि केसांची काळजी हवीच! | पुढारी

साहित्य – आख्या शिकाकाई शेंगा 100 ग्राम, रिठे 50 ग्राम, सुका आवळा 50 ग्राम, नागरमोथा पावडर 50 ग्राम, ताजा-ताजा कढीपत्ता साधारण 5 ते 10 रुपयांचा

Life Style शिकाकाई केसांना मुलायम बनवते. रिठे केसांमधील अनावश्य तेल काढून टाकते. सुका आवळा केसांना मजबुती देतो. नागरमोथा आणि कढीपत्त्यामुळे केसांमधील कोंडा आणि उवा दूर होण्यास मदत होते. याशिवाय कढीपत्त्याचा केसांना आणखी देखिल फायदा होतो.
कृती – कढीपत्ता थोडासा धुवून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात हे सर्व साहित्य टाका. हे सर्व साहित्य तो पाण्यात तोपर्यंत उकळवा जोपर्यंत सर्वांचा अर्क उतरवून किमान निम्म्यापेक्षा कमी पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत उकळवा. उकळल्यानंतर हे मिश्रण गार होऊ द्या.

मिश्रण हलकेच गार झाले. की हा सर्व चोथा या पाण्यात चांगला पिळून काढा. म्हणजे उरलेले घटक देखिल मिळतील. आता हा चोथा फेकून द्या. जे घट्ट पाणी तयार झाले असेल ते जरा आणखी गार झाल्यावर एका बाटलीत भरून ठेवा. आंघोळ करताना एका छोट्या बादलीत पाणी घेऊन हा तयार झालेला शाम्पू तुमचे केस किती दाट आहे त्या प्रमाणात पाण्यात टाका आणि चांगला फेस होई पर्यंत ढवळून घ्या. तयार झालेले फेसळलेले पाणी आहे त्या पाण्याने केस धुवा, नंतर साध्या पाण्याने थोडे केस धुवा. पाहा केसांमधील अतिरिक्त तेल देखिल निघून जाईल आणि केस अगदी मुलायम आणि सुंदर होतील.

हे ही वाचा :

केस गळतात? मग, केसांची अशी घ्या काळजी

त्वचा आणि केसांची काळजी हवीच! | पुढारी

Back to top button