Nandan Nilekani | नंदन नीलेकणी यांच्याकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

Nandan Nilekani | नंदन नीलेकणी यांच्याकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन : इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांनी 315 कोटी रुपयांची देणगी मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (IIT) दिली आहे. नीलेकणी यांनी 1973 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवीसाठी या संस्थेत प्रवेश घेतला होता. त्यास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही देणगी दिली आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांना चालना देणे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे. आणि IIT मुंबईमध्ये विकसित होत असलेल्या टेक स्टार्टअप इकोसिस्टमचे पालनपोषण करणे, यासाठी ही देणगी देण्यात आली आहे.

नीलेकणी (Nandan Nilekani) यांनी म्हटले आहे की, आयआयटी मुंबई माझ्या आयुष्यातील आधारस्तंभ आहे. माझ्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये आकार देत माझ्या आयुष्याच्या प्रवासाची पायाभरणी केली आहे. मी या प्रतिष्ठित संस्थेशी जोडलो गेलो. त्यास 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मी पुढे पाऊल टाकण्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी योगदान दिल्याबद्दल या संस्थेचा कृतज्ञ आहे. ही देणगी केवळ आर्थिक योगदानापेक्षा खूप मोठी आहे. ज्या संस्थेने मला खूप काही दिले आहे. उद्याचे आपले जग घडवणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी याला ही देणगी समर्पित करत आहे.

दरम्यान, नीलेकणी यांनी यापूर्वी संस्थेला 85 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. आता त्यांनी 315 कोटी दिल्याने त्यांचे एकूण योगदान 400 कोटी रुपये इतके झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news