मुंबई, पुढारी ऑनलाईन; भाजप आणि शिवसेना हे पारंपरिक मित्र आहेत, मात्र त्यांच्या २०१९ मध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला. मात्र, ही गोष्ट खुर्चीचा मोह असलेल्या उद्धव ठाकरे यांना कळत नसावी, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
२०१९ मध्ये शिवसेना – भाजप मध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला.
परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी.' अशी टीकाही पाटील यांनी केली.
राज्यात सध्या सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजपामध्ये विविध मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील माध्यमांशी संवाद साधत होते.
ते म्हणाले, 'मंदिरांचा विषय असाच आहे मंदिरं उघडणं हे काँग्रेस, राष्ट्रवादीला चालणार नाही. मग त्यांना चालणार नाही का? मग खुर्चीसाठी मी देखील उघडणार नाही.
मंदिरं न उघडण्याचे कुठलेही दुसरे कारण नाही. खुर्चीवर प्रेम असणारे जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांना स्वत:च्या पक्षाचं काय नुकसान झालेय हे कळत नाही.
मला एकाच प्रश्नाचं फक्त उत्तर द्या, की संजय राऊत व्यतिरिक्त कुणी बोलताना दिसतयं का? आमचे परममित्र दिवाकर रावते कुठे गेले?
आमचे अतिपरममित्र रामदास कदम कुठे गेले? अनिल देसाई, सुभाष देसाई, रवि वायकर कुठे गेले? कुठे गेलेत सगळेजण?
एकटे संजय राऊतु बोलत आहेत.'
ते पुढे म्हणाले,' एकतर ते बोलले तर ते खरं बोलतील, म्हणून बोलू देत नाहीत किंवा ते नाराज असतील.
की काय संजय राऊत यांना बोलायचं बोलू दे, खूप नुकसान करतोय.
तरीही ते गप्प आहेत. खेडला अख्खी पंचायत समिती पळवून नेली तरीही ते काहीच करू शकले नाहीत. संजय राऊत आले त्यांच्या स्टाईलने बोलले आणि गेले.
त्यांच्या स्टाईलचं फार मला कौतुक वाटते, मोठ्या स्टाईलने आले आणि होऊ देणार नाही. शेवटी राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा सभापती झाला.'
हेही वाचा: