France | ३०३ भारतीयांच्या मानवी तस्करीचा संशय, विमान फ्रान्सच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

France | ३०३ भारतीयांच्या मानवी तस्करीचा संशय, विमान फ्रान्सच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन : भारतीय ३०३ प्रवाशांना घेऊन दुबईतून निकारागुआला जाणारे विमान फ्रान्समध्ये (France) मानवी तस्करीच्या (human trafficking) संशयावरून थांबवण्यात आल्याच्या घटनेच्या संदर्भात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

प्रोसीक्यूटर्स कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, अधिकार्‍यांना एक सूचना मिळाली होती की हे विमान मानवी तस्करीला बळी पडतील अशा लोकांना घेऊन जात आहे. 'ले मोंडे' वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत पीटीआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की राष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधी युनिट जुनाल्को या प्रकरणी तपास करत आहे.

फ्रान्सच्या मार्ने ईशान्य विभागानुसार, ए ३४० हे रोमानियन कंपनीचे लीजेंड एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे विमान गुरुवारी लँडिंगनंतर व्हॅट्री विमानतळावरच थांबले". व्हॅट्री विमानतळ पॅरिसच्या पूर्वेला १५० किलोमीटर अंतरावर आहे आणि मुख्यतः ते बजेट एअरलाईन्स सेवा देते.

३०३ भारतीयांच्या मानवी तस्करीप्रकरणी फ्रान्सने रुमानियाचे विमान ताब्यात घेतले आहे. दुबईहून उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे हे विमान फ्रान्समध्ये उतरविण्यात आले होते. त्यावेळी पोलिस चौकशीत मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पॅरिसमधील पब्लिक प्रॉसिक्युटरने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातून मानवी तस्करी केली जात असल्याची टीप्स मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विमानाची तपासणी केली. त्यानंतर विमानातून ३०३ भारतीयांची मानवी तस्करी करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे हे विमान ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी या विमानाने दुबईतून उड्डाण केले होते.

विमानातील प्रवाशांची अवस्था पाहिल्यानंतर मानवी तस्करीचा संशय आला आहे. या विमानातून ३०३ भारतीयांना घेऊन निकारागुआकडे नेण्यात येत होते. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. वॅट्री विमानतळावरील स्वागत कक्षाला प्रतीक्षा कक्ष बनविण्यात आले असून, या ठिकाणी प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news