रायगड : सरसगड किल्ल्यावरून तरुण पाय घसरून पडला; रेस्क्यू टीमच्या मदतीने सुरक्षितस्थळी आणले

रायगड : सरसगड किल्ल्यावरून तरुण पाय घसरून पडला; रेस्क्यू टीमच्या मदतीने सुरक्षितस्थळी आणले

पाली; संदेश उतेकर : सुधागड पाली येथील सरस हा ऐतिहासिक गड किल्ला आहे. अनेकजण येथे ट्रेकिंगसाठी येत असतात. एका टीम या ठिकाणी ट्रेकिंगसाठी आली असाता, या मधील एक तरूण रात्री ३ च्या दरम्यान किल्ल्यावरून उतरताना पाय घसरून पडला. हा तरूण मुलुंड येथील आहे.

ही घटना समजताच पाली येथील नागरिकांनी खोपोली येथून, रेस्क्यू टीम व रुग्णवाहिका बोलवून शोधमोहिम सुरू केली. यानंतर या तरूणाला यशस्वीरित्या बाहेर काढून त्याला सुरक्षितस्थळी आणण्यात आले. या तरूणाच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचारासाठी या तरूणाला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news