एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, पगारासाठी शासनाकडून ३०० कोटी निधी वितरीत

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, पगारासाठी शासनाकडून ३०० कोटी निधी वितरीत

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य शासनाने ३०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळालेला नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०२२ चे वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी विनंती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांनी पत्रान्वये शासनास विनंती केली होती. त्यानुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासाठी सन २०२२-२३ मधील गृह अर्थसहाय्य तरतूदीमधून ३०० कोटी एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होतो. पण १२ तारीख उलटली तरी अद्याप कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याआधी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी करत संप केला होता. हा संप दीर्घकाळ चालला. राज्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण १० तारीख उलटून गेली तरी त्यांना पगार मिळालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना निश्चित वेळेत पगार न मिळणे हा न्यायालयाचा अपमान असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news