मोठा अनर्थ टळला! उजनीच्या किनाऱ्यावर एसटी बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक, तरुणाने धाडसाने स्टिअरिंग सांभाळत वाचवले ४० जणांचे प्राण

मोठा अनर्थ टळला!  उजनीच्या किनाऱ्यावर एसटी बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक, तरुणाने धाडसाने स्टिअरिंग सांभाळत वाचवले ४० जणांचे प्राण
Published on
Updated on

पुणे: आपल्याकडे काळ आला पण वेळ नाही ही म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यक्ष अर्थ उदगीर-पुणे बसमधून प्रवास करणाऱ्या 40 प्रवाशांना आला आहे. परंतु एका तरुणाच्या प्रसंगावधनामुळे ही एसटी बस उजनी धरनात जाऊन पडण्यापासून वाचली. या तरुणाच्या प्रसंगावधनामुळे बसमध्ये असणाऱ्या 40 प्रवाशांचा जीव वाचला आहे. या धाडसी तरुणाचे नाव आहे सुधीर रणे. तो पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील रहिवासी आहे.

सोलापूर- पुणे महामार्गावरून धावत होती. वेळ रात्रीच्या साडे दहा ते अकराची. सर्व प्रवासी झोपेत असतानाच अचानक बस सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला. या आवाजाने बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. खडबडून जागे झालेल्या प्रवाशांनी पाहिले तर बस चालकाने मान टाकलेली त्यांना दिसली. यानंतर बसमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. हे सर्व पाहून बसमधील एका युवकाने धाडस करून बसच्या स्टेरिंगचा ताबा घेतला. त्याच्या ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करीत त्याने हँडब्रेकवर बस थांबविली आणि मोठा अनर्थ टळला. चित्रपटात घडतो तसा अंगावर शहारे आणणारा प्रसंग घडला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर डेपोमधून पुण्याकडे निघालेली बस (MH 24 AU 8065) मधून 40 प्रवाशी प्रवास करत होते. पुणे – सोलापूर महामार्गावरून इंदापूर ओलांडून एसटी बस पळसदेव गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे ते बसच्या स्टिअरिंगवरच कोसळले. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकली. या धडकेनंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु त्याचवेळी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधन राखत आणि बस थांबवत मोठा अपघात टाळला. यानंतर बसमधील 40 प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

नशीब बलवत्तर असल्याने वेळीच बस नियंत्रणात आली, नाही तर बस महामार्गाच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पडली असती. यानंतर प्रवाशी सुधीर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने गोविद सूर्यवंशी हे शुद्धीवर आले. परंतु ते पुन्हा बेशुद्ध झाल्याने रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता एसटी बस घेऊन भिगवण येथील हॉस्पिटल गाठले. चालक सूर्यवंशी यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये भरती केल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होऊ शकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news