Omi Vaidya : ‘३ इडियट्स’ मधील ‘चतुर’ ओमी वैद्य दिसणार मराठी चित्रपटात

Omi Vaidya
Omi Vaidya

पुढारी ऑनलाईन डेस्क : थ्री इडीयट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता ओमी वैद्य मराठी चित्रपटात दिसणार आहे. (Omi Vaidya) ओमीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळातील गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच असा ओमीने निर्णय घेतला. (Omi Vaidya) आता ओमीची प्रमुख भूमिका असलेला 'आईच्या गावात मराठीत बोल' हा धम्माल विनोदी चित्रपट येत आहे. नव्या वर्षात १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या –

'आईच्या गावात मराठीत बोल' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर कलाकार आहेत.

टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती चित्रपटाचा अभिनेता समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा, धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का? सातासमुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक "मराठीपण" जोपासू शकतील काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समरला मिळतात. प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळेमुळे याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो, तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.
या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.

ओमी अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्राबद्दल अभिमान असणारा अभिनेता आहे. अमृता हर्डीकर यांनी अमेरिकेतच चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. सिनेमॅटोग्राफी योगेश कोळी, संगीत-पार्श्वसंगीत अविनाश विश्वजीत, संकलन मयूर हरदास, ओमी वैद्य यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news