मुंबईमध्‍ये हॉटेलला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्‍यू, ५ जखमी

मुंबईमध्‍ये हॉटेलला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्‍यू, ५ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबईतील सांताक्रूझ परिसरात असलेल्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर आज (दि.२७) दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत तिघांचा होरपळून मृत्‍यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

या दुर्घटनेसंदर्भात अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, सांताक्रूझ परिसरातील हॉटेल गॅलेक्सीला अचानक आग लागली. हॉटेलमधून आठ जणांची सुटका करून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे अनेक टँकर हॉटेलकडे रवाना करण्यात आल्‍या आहेत. या दुर्घटनेत तिघांचा होरपळून मृत्‍यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news