शिमला ; पुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. या दरम्यान आज (शनिवार) सकाळी हिमाचल प्रदेशमधील सकाळ भूकंपाच्या धक्क्यांनी झाली. जवळपास ८ मिनिटांच्या फरकाने भूकंपाचे दोन धक्के जाणवले. आज पहाटे ५:१७ वाजता हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेपासून २२ किमी पूर्वेला ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के चम्बा जिल्हाच्या सीमावर्ती भागातील गावांमध्येही जाणवले. एकापाठोपाठ दोनवेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांगडा आणि चम्बा जिल्ह्याच्या रहिवाशांमध्ये ११८ वर्षापूर्वी आलेल्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत.
शिमला हवामान केंद्राने जारी केलेल्या अहवालानुसार पहाटे ५.१० वाजता भूकंपाचे पहिले धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू धर्मशाळेच्या धौलाधर टेकड्यांखालील कांगडा आणि चंम्बा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात, आरएफ अंद्राला ग्रोनमध्ये जमिनीच्या पृष्ठभागापासून ०५ किमी भूगर्भात होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ इतकी नोंदवली गेली. काही मिनिटांनंतर 05:17 वाजता भूकंपाचा दुसरा धक्का बसला. ज्याची तीव्रता पहिल्या भूकंपापेक्षा अधिक म्हणजे 3.2 इतकी नोंदवली गेली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा :