नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली २५२ घरे लवकरच तृतीयपंथीयांना देण्यात येणार आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर पाठोपाठ राजधानी मुंबईलादेखील या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात राज्याच्या वित्त विभागाने आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सामाजिक न्याय विभागाने नागपूरच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांना घरे देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यापुढे मैला उपसण्यासाठी नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात रोबोटचा वापर करता येईल का? यादृष्टीने चाचणी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
हेही वाचलंत का ?