एक चुकीचे बटण दाबले आणि उडाले २५० कोटी, जाणून घ्या देशातील सर्वात मोठी ‘Fat finger trade’ चूक कशी घडली?

एक चुकीचे बटण दाबले आणि उडाले २५० कोटी, जाणून घ्या देशातील सर्वात मोठी ‘Fat finger trade’ चूक कशी घडली?
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन

एक छोटी चूक मोठे नुकसान करु शकते. याचा प्रत्यय गुरुवारी एका व्यवहारादरम्यान आला. गुरुवारी सायंकाळी एनएसई (NSE) च्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये चुकीचे बटण (key) दाबल्याने ऑर्डर देणाऱ्या एका अज्ञात ब्रोकिंग हाऊसला (unknown broking house) २००-२५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रेडिंग चूक (Fat finger trade) आहे. जवळपास एक दशकापूर्वी ब्रोकरेज फर्म Emkay Globalच्या एका ट्रेडरला निफ्टी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्समध्ये किंमत आणि प्रमाणासाठी चुकीची key दाबल्याने ६० कोटी रुपयांचा फटका बसला होता.

माऊसने मिसक्लिक करणे अथवा चुकीची key दाबल्याने होणाऱ्या चुकीला फॅट फिंगर ट्रेड (fat finger trade) म्हटले जाते. यामुळे ट्रेड सुरु करणाऱ्या व्यक्तीला मोठे नुकसान होते. तर दुसऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो.

गुरुवारी, दुपारी २.३७ ते २.३९ च्या दरम्यान एका व्यापाऱ्याने निफ्टी कॉल ऑप्शन्सचे २५ हजार लॉट १४,५०० स्ट्राइकवर ०.१५ रुपये इतक्या कमी किमतीत विकले. त्यावेळी कॉन्ट्रॅक्टची बाजारातील किंमत सुमारे २,१०० रुपये सुरु होती. निफ्टी कॉन्ट्रॅक्टचा प्रत्येक लॉट ५० अंकांचा असतो. त्यामुळे चुकीची key दाबल्याने २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मार्केटमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोलकाता येथील कमीतकमी दोन ब्रोकर्संना लॉटरी लागली. एकाच्या खात्यात ५० कोटी आणि दुसऱ्याच्या खात्यात २५ कोटी आले. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी निफ्टी १६,६०० वर व्यवहार करत होता. गुरुवारी एनएसई १०५ अंकांच्या तेजीसह १६,६२८ वर बंद झाला होता. हे नेमके झाले कसे हे अधिक जाणून घेण्याचा मार्केटमधील तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत.

फॅट फिंगर ट्रेड म्हणजे नेमके काय? (fat finger trade)

कीबोर्डवरील चुकीचे बटण दाबल्याने अथवा चुकीच्या ठिकाणी माउस क्लिक केल्याने चुकीचा व्यवहार होतो. त्याला फॅट फिंगर ट्रेड असे म्हटले जाते. उदा. जर कोणी ट्रेडरने १,०१० रुपये भाव प्रमाणे एक लाख शेअर्स विकले. पण त्याचे बाजार मुल्य १,१०० रुपये आहे. तर त्याला ९० लाख नुकसान होईल. याचाच अर्थ असा की विकणाऱ्याला तोटा होईल आणि दुसऱ्यांना त्याचा फायदा होईल.

२०१४ मध्ये एका जपानी एक्सचेंजवर फॅट फिंगरमुळे ६०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. २०१८ मध्ये Deutsche बँकेतील अनेक खात्यांमध्ये २८ अब्ज डॉलर चुकीने ट्रान्सफर झाले होते. ऑक्टोबर २०१२ मध्ये निफ्टी कॉन्ट्रक्टसमध्ये फॅट फिंगरमुळे Emkay Global च्या एका ट्रेडरचे ६० कोटी रुपये नुकसान झाले होते.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps.

Stay updated with the latest news at your fingertips.

Android

iOS

Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news