Nagar Crime news : सराफ दुकान फोडून 24 लाखांची चोरी

Nagar Crime news : सराफ दुकान फोडून 24 लाखांची चोरी
Published on
Updated on

नगर :  पुढारी वृत्तसेवा : शहरातील सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्स हे दुकान रविवारी पहाटे फोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिने आणि रोख रक्कम असा 24 लाख 68 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोरांच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना केली आहेत. संतोष सीताराम सहदेव ऊर्फ वर्मा (रा. गुंजाळ हॉस्पिटल, माणिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 30 सप्टेंबर रोजी रात्री 9.15 वाजता दुकानातील सोने, चांदी व रोकड व्यवस्थित ठेवून दुकान बंद करून घरी गेलो होतो.

रविवारी पहाटे कोतवाली पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांचा फोन आला. आम्ही तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. दुकानात येऊन पाहणी केली असता कॅश टेबलच्या ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यातील सोने व रोख रक्कम चोरीस गेलेली दिसली. चोरांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 24 लाख 68 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

याच आरोपींनी फोडली लासलगावात दुकाने
आरोपींनी गुन्ह्यात एक पांढर्‍या रंगाची मोटारकार वापरली आहे. ती कार नाशिक जिल्ह्यातून चोरून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मोटारकार मालकाशी संपर्क केला आहे. आरोपींनी लासलगाव परिसरात काही दुकाने फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दृष्टीनेही पोलिस तपास करत असल्याचे सांगण्यात आले.

तपासासाठी पथके रवाना
चोरीची घटना समजल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. चोराच्या ठशाचे नमुनेही घेण्यात आले. आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.

आठ मिनिटांत फोडले दुकान
आरोपींनी मध्यरात्री सराफ बाजारात टेहळणी केली. त्यानंतर पहाटे वर्मा ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. अवघ्या आठ मिनिटांत सोने-चांदी व रोख रक्कम असा ऐवज घेऊन पोबारा केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news