![देशाच्या विविध भागात २,३८१ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F12%2FMUMBAI-NCB.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अंमली पदार्थविरोधी खात्याने (एनसीबी) मागील काही काळात सुमारे 2381 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. हे अंमली पदार्थ आज (दि.१७) देशाच्या विविध भागात नष्ट करण्यात आले. अंमली पदार्थ नष्ट करण्याचा हा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आभासी माध्यमातून पाहिला.