नोव्हेंबर २०२२ च्या अखेरीस, ई-केवायसी (E-KYC) व्यवहारांची एकूण संख्या १३५०.२४ कोटी इतकी होती. बँका व बँकेतर आर्थिक सेवांमध्ये 'आधार ई-केवायसी सेवे'मुळे पारदर्शकता आली असून ग्राहकांना येणाऱ्या अनुभवातही सुधारणा झाली आहे, यामुळे व्यवसाय करण्यात सुलभता निर्माण झाल्याचा दावा केंद्राने केला आहे. 'आधार'धारकाने स्पष्ट मान्यता दिल्यानंतरच ई-केवायसी व्यवहार केला जातो. त्यात केवायसी संबंधित कागदोपत्री कामे आणि व्यक्तीच्या प्रत्यक्ष हजेरीची गरज संपुष्टात आली आहे.