नुसता धुरळाच! मोटोरोला बनवत आहे २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल | पुढारी

नुसता धुरळाच! मोटोरोला बनवत आहे २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोबाईल निर्मितीमधील नामवंत कंपनी असलेल्या मोटोरोलाने २०० मेगापिक्सलचा मोबाईल बनवला आहे. हा मोबाईल सुरुवातीला चीनमध्ये लॉंच होईल. २०० मेगा पिक्सल इतक्या क्षमतेचा कॅमेरा असलेला हा जगातील पहिला मोबाईल असेल.

मोटोरोलच्या तिसऱ्या जनरेशनच्या Razr या फोल्डेबल फोनमध्येही हा कॅमेरा असणार आहे. Frontier या कोड नावाने हा कॅमेरा विकसित केला जात आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड आणि १२ मेगापिक्सलचा टेलेफोटो तर ६० मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेराही असणार आहे.

मोटोरोलाचे चीनमधील सरव्यवस्थापक शेन जीन यांनी सोशल मीडियावर या मोबाईलसंदर्भात संकेत दिले आहेत. अर्थात फक्त कॅमेराच नाही तर या मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्लस जनरेशन वन हा अत्याधुनिक असा प्रोसेसर असणार आहे. मोटोरोलाचे पूर्वीचे फोल्डेबल फोन हे कमी क्षमतेच्या प्रोसेसरवर काम करत होते, त्यामुळे हवा तसा वेग मिळत नव्हता.

हा फोन चीनमध्ये आणि चीनच्या बाहेर केव्हा लाँच होणार याची अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही. मोटोरोलाने चीनमध्ये एज एक्स ३० हा फोन डिसेंबर महिन्यात लाँच केला होता. २०० मेगापिक्सलचा फोन या वर्षांच्या अखेरीस चीनमध्ये लाँच होईल. अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button