काेल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरकपातीची कंपन्यांकडून अद्याप अंमलबजावणी नाहीच ; ग्राहकांमधून संताप व्यक्त

पुढारी ऑनलाईन डेस्क :
राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी केले आहेत; परंतु अद्याप आज (दि.२४) सकाळी आठवाजेपर्यंत तरी कंपनीकडून नवीन सुधारित दर आलेले नाहीत. त्यामुळे आजच्या पेट्रोल- डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कमी करून इंधन दरकपात केली आहे; पण राज्य सरकारच्या कपातीची कंपनीकडून अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याचे पंपावर ही दरकपात झाली नसल्याचे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर असोशिएशनच्या वतीने प्रसिद्ध केले आहे. कदाचित ही अंमलबजावणी मंगळवार (दि.२३) पासून होण्याची शक्यता वर्तवली होती, पण ती झालेली नसल्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचलंत का ?
- ठाकरेंच्या निकटवर्तीयांना राजकीय पाठबळ, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- नाशिक : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पोर्टल; समाज कल्याणचा पुढाकार
- सावधान लहान मुले होत आहेत अटेंशन सिकर; मोबाईल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले