Sunil Valson : 83 च्या संघात असूनही ‘हा’ क्रिकेटर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही

Sunil Valson : 83 च्या संघात असूनही ‘हा’ क्रिकेटर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही
Sunil Valson : 83 च्या संघात असूनही ‘हा’ क्रिकेटर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 25 जून 1983 हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिवस होता जेव्हा भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. भारतापूर्वी वेस्ट इंडिज 1975 आणि 1979 मध्ये दोनदा वर्ल्ड चॅम्पियन बनले होते. त्यामुळे 1983 चा 'वर्ल्ड कप' भारतासाठी खास आहे कारण टीम इंडियाने अंतिम फेरीत दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून हा पराक्रम केला होता. (1983 world cup team sunil valson)

या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारू शकणार नाही असे त्यावेळचे क्रिकेट दिग्गज आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले होते. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघांनाही जे जमले नाही ते भारताच्या युवा संघाने 24 वर्षीय कपिल देवच्या नेतृत्वाखाली करून दाखवले. यादरम्यान भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दमदार खेळ दाखवून एका नव्या पर्वाची सुरुवात केली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाने आपल्याला सुनील गावस्कर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, के. श्रीकांत, मदन लाल आणि रॉजर बिन्नीसारखे प्रतिभावंत खेळाडू दिले. (1983 world cup team sunil valson)

38 वर्षांनंतरही विजयाच्या त्या आठवणी चॅम्पियन संघातील प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्या हृदयात ताज्या आहेत. पण कपिल देवच्या त्या संघातील एकमेव खेळाडू होता जो त्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता, पण त्याला ना विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना खेळायला मिळाला, ना देशासाठी तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला. (1983 world cup team sunil valson)

'तो' खेळाडू कोण होता..

सुनील वाल्सन (Sunil Valson) असे या खेळाडूचे नाव आहे. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत ते वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघाचे सदस्य होते. मात्र, या काळात त्यांना एकही सामना खेळायला मिळाला नाही. 'वर्ल्ड कप'मधून परतल्यानंतर सुनील वाल्सन यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ते एक उत्तम वेगवान गोलंदाज होते, पण दुर्दैवाने सुनील भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकले नाही.

सुनील वाल्सन यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी केली, परंतु भारतीय संघात कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी, मदन लाल आणि चेतन शर्मा सारख्या गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे त्यांना त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. पत्रकार मकरंद वायंगणकर यांनी काही वर्षांपूर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. त्यांनी शेअर केलेला तो एक खूप जुन्या कागदाचा फोटो होता; पण त्या कागदाचे ऐतिहासिक महत्त्व त्यावरील मजकूर वाचल्यानंतरच कळतो. या कागदावर 1983 च्या विश्वचषक (83 World Cup) स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा पगार लिहिला आहे. त्या पत्रकात सुनिल वाल्सन यांचे नाव 14 व्या क्रमांकावर आहे.

वाल्सन (Sunil Valson) यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या 12 दिवस आधी मी भारतीय संघाचा भाग असल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा मला संघातील निवडीबाबत सांगितले गेले तेव्हा मी इंग्लंडमध्येच डरहम वेस्ट कोस्ट लीगसाठी खेळत होतो. मला क्लबच्या एका अधिकाऱ्याने भारतीय संघातील निवडीबाबत माहिती दिली. त्यानंतर मी खात्री करण्यासाठी कीर्ती आझाद यांना फोन करून विचारणा केली.'

ते म्हणाले, 'मला माहित होते की प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण जाईल. मला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, पण संघातील 14 खेळाडूंनी विश्वचषक जिंकला होता आणि मी त्यापैकी एक होतो. माझ्याकडून हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.'

विश्वचषक स्पर्धेच्या संघात संधी कशी मिळाली? या प्रश्नावर वाल्सन (Sunil Valson) म्हणतात की, 'विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात आम्ही वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात आम्ही तत्कालीन चॅम्पियन वेस्ट इंडिजकडून ६६ धावांनी पराभूत झालो. यानंतर रॉजर बिन्नीला किरकोळ दुखापत झाली. अशा स्थितीत कर्णधार कपिल देव यांनी वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त सिद्ध न झाल्यास मला संधी मिळेल, असे सांगितले होते मात्र बिन्नीला मेडिकलमध्ये तंदुरुस्त घोषित करण्यात आले.

सुनील वाल्सन (Sunil Valson) हे डावखुरे वेगवान गोलंदाज होते. त्यांनी 1981-82 मध्ये तामिळनाडूकडून खेळताना प्रथम श्रेणीच्या 75 सामन्यांत 212 विकेट घेतल्या. तर लिस्ट A च्या 22 सामन्यात 23 विकेट घेतल्या. ते राईट हँड बॅट्समन होते. 75 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्यांच्या बॅटमधून केवळ 376 धावा आल्या. सुनील 2018 साली आयपीएलमध्ये "दिल्ली कॅपिटल्स" संघाचे संघ व्यवस्थापकही होते. (1983 world cup team sunil valson)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news