आयसीएमआरला ‘कोव्हॅक्सिन’ची १७१.७६ कोटींची रॉयल्टी

आयसीएमआरला ‘कोव्हॅक्सिन’ची १७१.७६ कोटींची रॉयल्टी

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाविरोधात भारतीय बनावटीची लस 'कोव्हॅक्सिन'मुळे आयसीएमआर ने १३६ कोटी रूपयांची कमाई आतापर्यंत केली आहे. लसीच्या शोधानंतर आयसीएमआरने उत्पादन तसेच पुरवठ्यासंबंधी भारत बायोटेक सोबत करार केला होता. आयसीएमआर एकूण ५% रॉयल्टी देण्यासंबंधी देखील कंपनीसोबत करारबद्ध असल्याचे माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आहे. राज्यसभेत डॉ. पवार यांनी दिलेल्या माहितीनूसार कोव्हॅक्सिनवर आयसीएमआरने केवळ ३५ कोटी रूपये खर्च केले आहेत. पंरतु, जानेवारी २०२२ पर्यंत कंपनीकडून आयसीएमआरला १७१.७६ कोटी रॉयल्टी स्वरूपात मिळाली आहे.

कोव्हॅक्सिन मधून मिळणारी रॉयल्टीचा वापर विविध शोध-संशोधनात करण्यात येईल, अशी माहिती आयसीएमआरच्या वरिष्ठ संशोधकांनी दिली आहे. जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये दोन डोस असलेल्या या लसीचा कोरोनाविरोधात वापर केला जात आहे. दरम्यान देशातील कोरोना संसर्गात गेल्या १८ दिवसांमध्ये जवळपास ८१ टक्क्यांची घट झाली आहे. पंरतु, केरळमध्ये अजूनही २० हजारांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची भर पडत आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट उच्चांकी पातळीवर पोहचल्यानंतर आता कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. पंरतु,कोरोनामृत्यूसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news