मुंबई : लपाछपी खेळताना लिफ्ट अंगावर पडून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू, सोसायटी अध्यक्षाला अटक

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन : सोसायटीत लपाछपीचा खेळ खेळत असताना अंगावर लिफ्ट पडून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील मानखुर्द परिसरातील सोसायटीत शुक्रवारी (दि.२८) घडली आहे. याप्रकरणी या भागातील निवासी सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. याप्रकरणी या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मानखुर्द येथील न्यू साई धाम सोसायटी या सात मजली इमारतीत १६ वर्षीय किशोरी तिच्या आजीच्या घरी आली होती. ती आपल्या भाऊ आणि चुलत भावांसोबत लपाछपी खेळत असताना हा अपघात झाला. ती पाचव्या मजल्यावर होती, तिच्या भावांना शोधण्याच्या प्रयत्नात तिने आपले डोके लिफ्टच्या दारावर  ठेवले. लिफ्ट खाली घसरत येत मुलीच्या डोक्यावर आदळली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत मुलीच्या कुटुंबाने हाऊसिंग सोसायटीच्या अधिकार्‍यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. लिफ्ट दुरूस्त करण्यास सांगूनही त्यांनी याची दखल घेतली नसल्याचे तिच्या कुटूंबियांनी म्हटले आहे. अलीकडेच एका ४४ वर्षीय वृद्धालाही या लिफ्टच्या अपघातात आपला जीव गमवावा लागला. यापूर्वी या सोसायटीत इमारतीची लिफ्ट खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक मुलगा देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी कुटुंबाने सोसायटीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना अटक केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news