Latest
Explosion of Gas Cylinder | मुंबई : शाळेच्या छतावर गॅस सिलिंडरचा स्फोट; दोन जखमी, गाड्यांचे नुकसान
पुढारी ऑनलाईन : मुंबईतील छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलच्या टेरेसवरील किचनमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. या दुर्घटनेत तीन दोनजण जखमी झाले असून, यामधील एकजण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेतील जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटात शाळेच्या ईमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत २६ वर्षीय भारत भारत मधु सिंग हा ६० ते ७० टक्के भाजला गेल्याने, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

