पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम कधी, कुणावर आणि कसे होईल, याचा नेम नाही. अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेने आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याशी लग्न निर्णय घेतला. पण, मुलाच्या घरातील सदस्यांनी नाकारलं तेव्हा दोघांनीही एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संबंधित शिक्षेकेला अटक केलेली आहे. (Love Story)
तामिळनाडू राज्यातील पेरंबलूर येथील ही घटना आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षिका २ वर्षांपूर्वी टीचर ट्रेनिंग कोर्सच्या निमित्ताने विक्रामंगलम येथे हायस्कूलमध्ये गेलेली आहे. या हायस्कूलमध्येच शिक्षिकेचा १५ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर जीव जडला. जेव्हा हे हायस्कूल शिक्षिकेने सोडले, तेव्हा दोघांमधील नातं तसंच टिकून राहिले. २२ ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी घरातील सदस्यांना न सांगता लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थ्याने बहिणीच्या बंद असलेल्या खोलीची चावी घेतली आणि शिक्षिकेसोबत राहू लागला. मात्र, खूप वेळ घरी न आल्यामुळे मुलाच्या आईने फोन केला. तेव्हा त्याने सर्व हकिकत सांगितली. "मी एका महिलेवर प्रेम करत आहे आणि आम्ही दोघे जण दीदीच्या घरी आहोत." मात्र, मुलाच्या आईने हे लग्न मान्य केलं नाही. त्यांनी त्या महिलेसोबत राहण्याची परवानगी दिली नाही. (Love Story)
आईसोबत झालेल्या चर्चेनंतर संबंधित अल्पवयीन मुलाने आणि शिक्षिकेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. दोघेही विष प्यायले. पण, थोड्या वेळाने मुलानेच शिक्षिकेला घेऊन रुग्णालय गाठलं. दोघांवरही उपचार करण्यात आलेय. उपचारानंतर दोघेही वाचले आहेत. पण, मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेविरुद्ध मुलाला फूस लावून लग्न करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिक्षिकेला अटक करण्यात आली. सध्या शिक्षिकेविरुद्ध पाॅस्को अंतर्गत न्यायालयीन कोठडीमध्ये पाठविण्यात आले आहे.