Water Storage : धरणांत गेल्या वर्षीपेक्षा 15 टक्के कमी पाणीसाठा

Water Storage : धरणांत गेल्या वर्षीपेक्षा 15 टक्के कमी पाणीसाठा

पुणे : राज्यात यावर्षी संपूर्ण पावसाळ्याच्या सिझनमध्ये पावसाने जोरदार हुलकावणी दिली. केवळ काही दिवसच पावसाने हजेरी लावली. ती देखील कमीच, त्याचा परिणाम धरणांत पाणीसाठ्यावर झाला असून, यावर्षी राज्यात असलेल्या सहा विभागांतील धरणांचा पाणीसाठा मागील वर्षी पेक्षा 15 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी केवळ 75.25 पाणीसाठा आहे; तर मागील वर्षी 90.06 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये होता. यावर्षीच्या पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता 'पाणीतूट' लक्षणीय जाणवणार असल्याचे दिसून येत आहे.

जलसंपदा विभागाच्या अंतर्गत राज्यात नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांच्या अंतर्गत 2 हजार 595 लहान, मध्यम आणि मोठी धरणे समाविष्ट आहेत. यंदा पावसाने चारही महिन्यात चांगलीच हुलकावणी दिली. केवळ जुलै महिन्यात आठ ते दहा दिवस पावसाने हजेरी लावली. उर्वरित संपूर्ण महिने कोरडे गेले.

आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे. या पावसाने सर्व भागांत हजेरी लावली आहे; मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. केवळ कोकण, विदर्भ या भागांत पावसाचे प्रमाण जास्त आहे; मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांत पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. दरम्यान, यावर्षी कमी पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यात 'पाणीतूट' मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ही दाहकता जास्त असण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी पाऊस लांबल्याने बहुतांश धरणे भरली होती. गेल्या वर्षी याच काळात जलाशयांमध्ये 90.06 टक्के पाणीसाठा होता. सर्वात जास्त 95.25 टक्के पाणीसाठा कोकणात, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 40.19 टक्के सर्वात कमी जलसाठा आहे. मागील वर्षी याच भागात 86.90 टक्के एवढा पाणीसाठा होता. विदर्भात यावर्षी पावासाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे नागपूर विभागात 90.92 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी 89.30 टक्के इतका पाणीसाठा होता.

  • सहा विभागांचा पाणीसाठा मागील वर्षी 90.06 टक्के होता. यावर्षी 75.25 टक्के असून, मागील वर्षी पेक्षा 14.81 टक्क्यांनी कमी आहे.

पाणीसाठा टक्केवारीत

विभाग      मागील वर्षी    सध्याचा
नागपूर       90.92          89.54
अमरावती  82.29           94.11
छत्रपती संभाजीनगर      40.19  86.32
नाशिक    76.75           86.90
पुणे           80.05          92.23
कोकण    95.26             90.36

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news