पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मुंबई तर उपाध्यक्ष बँकेत; भूमिका अजूनही अस्पष्ट

पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मुंबई तर उपाध्यक्ष बँकेत; भूमिका अजूनही अस्पष्ट
Published on
Updated on

पुणे: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील राजकारणाचे एक मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिंगबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांची भूमिका अजूनही ठरलेली नाही असे दिसते. दुर्गाडे हे मुंबईला रवाना झाले आहेत, परंतु ते अजित पवार आणि शरद पवार या दोघांकडेही जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे दुर्गाडे हे फोन ला प्रतिसाद देत नाहीत, तर उपाध्यक्ष सुनील चांदेरे हे बँकेच्या मुख्यालयात थांबले आहेत.

आपण दुपारी मुंबई ला जाण्यास निघणार आहोत. कुठे जायचे ते ठरविलेले नाही. एक दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल सर्वजण चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे चांदेरे यांनी सांगितले.

मुळशी चे तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे
मुळशी तालुक्यातून मुंबई येथील शरद पवार यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे15 कार्यकर्ते गेलेले असून त्यामध्ये तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news