BMW महागणार, महागाईमुळे कंपनीने घेतला निर्णय

BMW India
BMW India

पुढारी ऑनलाईन डेस्क : लक्झरी कारकरीता प्रसिद्ध असणाऱ्या बीएमडब्ल्यू इंडिया (BMW India) कंपनीने त्यांच्या कारच्या किंमतींमध्ये वाढ करणार असल्याचे सांगितले. कार निर्मिती करिता वाढत्या खर्चांचा विचार करता कंपनीने शुक्रवारी सर्व कारच्या किंमती वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. दैनंदिन होत असणाऱ्या महागाईचा फटका कार उत्पादित कंपन्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.

जर्मनीत मुख्यालय असलेल्या BMW समूहाची भारतातील BMW इंडिया ही उपकंपनी आहे. 2021 मध्ये, कंपनीने देशात एकूण 8,876 युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक 34 टक्के वाढ दर्शवते.

त्यांच्या सर्व मॅाडेल्सच्या किंमतीमध्ये 1 एप्रिलपासून 3.5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. वाढते मटेरिअल दर आणि लॉजिस्टिक खर्च तसेच सध्याच्या भौगोलिक-राजकीय परिस्थिती आणि विनिमय दर या सर्व बाबींचा परिणाम कारच्या निर्मितीवर होत आहे. या परिणामांमुळे कारनिर्मितीवर वाढत्या दरांचे मोठे संकंट उभे राहिले आहे. त्यामुळे कंपनीने किंमत वाढ करत असल्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या जर्मन ऑटोमेकरने एका निवेदनातून दिली आहे.

कंपनी 2 सिरिज ग्रॅन कूप (2 Series Gran Coupe), 3 सिरिज (3 Series) , 3 मालिका ग्रॅन लिमोझिन (3 Series Gran Limousine), एम 340i (M 340i), 5 सिरिज (5 Series), 6 सिरिज ग्रॅन टुरिस्मो (6 Series Gran Turismo), 7 मालिका (7 Series), X1, X3, X4, X5, X7 आणि MINI Countryman यारख्या भारतात बनवल्या जाणाऱ्या लोकल मॅाडेल्स विक्रीमध्ये अग्रेसर आहेत.

बीएमडब्ल्यू (BMW) इंडियाने गेल्या 12 महिन्यांत केलेली ही तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी, कंपनीने एप्रिल आणि ऑक्टोबर 2021 मध्ये काही निवडक मॉडेल्सचे दर वाढवलेले होते.

BMW कंपनी दरवाढीच्या बाबतीत आता ऑडी आणि मर्सिडीज-बेंझच्या यादीत सामील झाली आहे, कारण या कंपन्यांनी याआधीच त्यांच्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news