Gems Stones : ‘या’ ५ रत्नांमुळे दूर होते पैशांची तंगी; धनसंपत्तीमध्ये होतो मोठा लाभ  | पुढारी

Gems Stones : 'या' ५ रत्नांमुळे दूर होते पैशांची तंगी; धनसंपत्तीमध्ये होतो मोठा लाभ 

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याला पैशांची अडचण येऊ नये आणि घरात नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद असावा. कित्येक वेळा काबाड कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही आणि अनाठायी पैसा खर्च होत राहतो. रत्नशास्त्रात (Gems Stones) याविषयी काही उपाय सांगितले आहेत. रत्नशास्त्रात काही रत्नांचा उल्लेख आहे, जे धारण केले तर समृद्धी प्राप्त होते. चला तर… अशा धनप्राप्ती करून देणारे रत्न कुठले ते सविस्तर पाहू…

सोनेरी रत्न : रत्नशास्त्रानुसार विनाकारण खर्च होणारा पैसा वाचवायचा असेल, तर सोनेरी रत्न धारण करायला हवे. सांगितले जाते की, हे रत्न धारण केले की, माणसाचे दिवस बदलतात. तुमच्या हातात पैसा टीकत नसेल तर हे रत्न धारण करा, त्यातून तुम्हाला धनप्राप्ती होऊ लागते.

हिरव्या रंगाचा खडा : जर तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करत असाल आणि आर्थिक परिस्थिती व्यवस्थित राहावी, असे वाटत असेल तर हिरव्या रंगाचा खडा (Gems Stones) धारण करणे उत्तम आहे. हा खडा तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर व्यवसायही भरभराटीस येतो.

टायगर रत्न : सर्वांत प्रभावी आणि त्वरीत लाभदायी ठरणारे हे रत्न आहे. त्यामुळेच या रत्नाला टायगर रत्न मानले जाते. तुमच्या आयुष्यातील बिघडलेली सर्व कामे या रत्नामुळे व्यवस्थित होतात, असं सांगितले जाते.

माक्षिक रत्न : हे रत्न एक खनिज आहे, जे गंधकापासून तयार होते. हे रत्न धारण केल्यानंतर पैसे कमविण्याचे नवनवे मार्ग सुचतात. हे रत्न काचेसारखे चमकत असते. रत्नशास्त्रानुसार या रत्नातून आत्मविश्वास निर्माण होतो.

ग्रीन एव्हेंच्युरिन : हे रत्न व्यापाऱ्यांसाठी खूप लाभदायी असते. जी व्यक्ती हे रत्न धारण करते त्या व्यक्तीकडे पैसा आकर्षित होते आणि पैसे कमविण्याचे नवनवीन मार्ग तयार करत असते.

हे वाचलंत का? 

Back to top button