रायगड: खारघर दुर्घटनेत आतापर्यंत १३ श्री सदस्यांचा मृत्यू

रायगड: खारघर दुर्घटनेत आतापर्यंत १३ श्री सदस्यांचा मृत्यू

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : खारघर दुर्घटना प्रकरणात आज (दि. १७) आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 13 वर पोहोचला आहे. विनायक हळदकर (वय 55, रा. कल्याण) असे मृताचे नाव आहे. खारघर येथे रविवारी (दि.१६) डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम भर दुपारी असल्याने अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला.

सुमारे 300 पेक्षा जास्त सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांच्यावर नवी मुंबईमधील वेळवेगळ्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, रविवारी संध्याकाळी 6 नंतर एका श्री सदस्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्री 11 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. तर आज सकाळी आणखी २ श्री सदस्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत श्री सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :

1) महेश नारायण गायकर (वय 42, वडाळा, मुंबई (मूळगाव म्हसळा, मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, रा. म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, रा. गिरगाव, मुंबई (मूळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30 रा. शिरसाटबामन पाडा, विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58. गाव – जव्हार, पालघर)
6) कलावती सिद्धराम वायचळ (वय 46, रा. सोलापूर)
7) भीमा कृष्णा साळवी (वय 58, रा. कळवा, ठाणे)
8) सविता संजय पवार (वय 42, रा. मुंबई)
9) पुष्पा मदन गायकर (वय 64, रा. कळवा, ठाणे)
10) वंदना जगन्नाथ पाटील (वय 62, रा. करंजाडे, पनवेल)
11) मीनाक्षी मिस्त्री (वय 58, वसई)
12) गुलाब बबन पाटील (वय 56, विरार)
13) विनायक हळदणकर (वय 55, रा. कल्याण)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news