Omicron variant Update : दिल्लीत ‘ओमायक्रॉन’?; १२ संशयित रूग्णांवर उपचार

Omicron variant Update : दिल्लीत ‘ओमायक्रॉन’?; १२ संशयित रूग्णांवर उपचार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

Omicron variant Update : देशात ओमायक्रॉनचे दोन रूग्ण कर्नाटकमध्ये आढळले आहेत. आता राजधानी दिल्लीत १२ लोक संसर्गग्रस्त असल्याची भीती वर्तवली जात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटने ग्रस्त असल्याच्या प्राथमिक शक्यतेच्या आधारे या सर्व रूग्णांना लोकनायक जय प्रकाश नारायण (एलएनजेपी) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी आठ ओमायक्रॉन बाधित संशयितांना एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, इतर चार रूग्णांना शुक्रवारी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचे कोरोना अहवाल येणे अद्याप बाकी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार संशयितांपैकी दोघे ब्रिटन वरून, एक फ्रान्स तर एक नेदरलँडचा प्रवास करून भारतात परतले आहेत. चारही संशयित प्रवाशांचे तपासणी अहवाल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आल्याचे कळतेय.

Omicron variant Update : ४० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना बुस्टर डोस द्या!

देशातील वैज्ञानिकांनी ४० वर्षांहून अधिक वयोगटातील उच्च धोका असलेल्या नागरिकांसाठी प्राध्यान्याने कोरोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. भारतीय सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स सिक्वेंसिंग कंसोर्टियमच्या (इनसाकोग) साप्ताहिक बुलेटिनमध्ये ही आवश्यकता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या जिनोमिक्स बदलावर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने तयार केलेल राष्ट्रीय प्रयोगशाळेचे नेटवर्क म्हणजे 'इनसाकोग' आहे. ओमायक्रॉन भारतात दाखल झाल्याने सरकारची चिंतेत भर पडली आहे. संसर्गाचा अधिक धोका असलेल्या लक्ष करून त्यांना बूस्टर डोस देण्यासंबंधी विचार केला जावू शकतो. ओमायक्रॉनवर विद्यमान लसी प्रभावी नसल्या तरी यांच्या माध्यमातून गंभीर संसर्गाचा धोका कमी करण्याची संभावना असल्याचे इनसाकोगकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला सफर करूया हिमाचल प्रदेशच्या रघुपूर किल्ल्याची | Himachal Pradesh vlog

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news