नवी मुंबई, शिर्डी, सिंधुदुर्गसह देशात २१ ‘ग्रीनफिल्ड’विमानतळ उभारणार, ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती | पुढारी

नवी मुंबई, शिर्डी, सिंधुदुर्गसह देशात २१ 'ग्रीनफिल्ड'विमानतळ उभारणार, ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  नवी मुंबई, शिर्डी, सिंधुदुर्गसह देशभरात २१ ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत दिली. नवी मुंबई, शिर्डी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळे उभारण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले.

केंद्र सरकारने देशात नव्या ग्रीनफिल्ड अर्थात हरितक्षेत्र विमानतळांच्या उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, प्रक्रिया आणि परिस्थिती यांचे दिशादर्शन करण्यासाठी हरितक्षेत्र विमानतळ धोरण-२००८ ची आखणी केली आहे.

पुणे : ‘ती’ अतिक्रमणे भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आशिर्वादानेच

हरितक्षेत्र विमानतळ धोरणाअंतर्गत सरकारने देशात या हरितक्षेत्र विमानतळांची उभारणी करण्यासाठी तत्वतः मंजुरी दिली आहे. गोव्यातील मोपा, कर्नाटकात कलबुर्गी, विजापूर, हासन आणि शिमोगा, मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे दतिया, उत्तर प्रदेशात कुशीनगर आणि नोएडा (जेवर), गुजरातमध्ये ढोलेरा आणि हिरासर, पॉन्डेचेरीत करैकल, आंध्र प्रदेशात दगादर्थी, भोगपुरम आणि ओरवाकल, पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर, सिक्कीममध्ये पॅकयाँग, केरळमधील कन्नूर आणि अरुणाचल प्रदेश मध्ये होल्लोंगी (इटानगर) या ठिकाणांचा समावेश आहे.

मोपा, नोएडा, ढोलेरा, हिरासरी, भोगपुरम, कन्नुर आणि कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे उभारली जातील. तर, उर्वरित ठिकाणी राष्ट्रीय विमानतळे उभारली जातील. यापैकी, दुर्गापूर, शिर्डी, सिंधुदुर्ग, पॅकयाँग, कन्नूर, कलबुर्गी, ओरवाकल आणि कुशीनगर या आठ विमानतळांचे काम सुरु झाले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

हे ही वाचलं का 

Back to top button