पंढरपूर पुढारी वृत्तसेवा : सुमारे 132 किलो वजनाची 8 लाख रुपये किमतीची सुगंधी चंदनाची ओली लाकडे वाहतूक करणार्या दोघांवरती पंढरपूर तालुका पोलिसांनी मंगळवार दि. 8 रोजी रात्री 11 च्या दरम्यान कारवाई केली आहे.यामध्ये पोलिसांनी 132 किलो 900 ग्रॅम सुगंधी चंदन, ज्याची किंमत 7 लाख 97 हजा 400 रुपये आहे. तर यामध्ये एक कार असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 व महाराष्ट्र अधिनियम कलम 29 प्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर मोहोळ रोडवरील तीन रस्ता या ठिकाणी वाहन तपासणी दरम्यान सिल्व्हर रंगाची इर्टीका कार (एम.एच 42 के 7611) मध्ये पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे आढळून आली. यामध्ये एकूण चार नायलॉनच्या पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे 132 किलो 900 ग्रॅम (एकुण किंमत 7 लाख 97 हजार 400 रुपये) व एक सिल्व्हर रंगाची एर्टिका कार (किंमत 5 लाख) असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चालक रमेश महादेव तेलंग (वय 25 ) रा.तुंगत ता.पंढरपूर, कचरुद्दीन अल्लामीन जमादार (वय 35 ) रा.पेनुर ता.मोहोळ यांना अटक करण्यात आली आहे. वनपाल एस. एस. पत्की, वनरक्षक एस. डी. कांबळे यांनी सर्व मालाची पाहणी केली.
हेही वाचलत का?