पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमध्ये कोळसा खाणीत दबून १३ कामगाराचा मृत्यू झाला आहे. ( Jharkhand mine collapse ) खाणीतील ढीगार्याखाली अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. गोड्डा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. मात्र या घटनेसंदर्भात पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कोळस खाणीत अवैधरित्या उत्खनन होत होते. खाणीत सुमारे ६० कामगार उत्खनाचे काम करीत होते. या खाणीत २० फुटांहून कोळशाचा ढीगारा कामगारांच्या अंगावर कोसळला. याखाली कामगार गाडले गेले. आतापर्यंत १३ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बाराहून अधिक कामगार बेपत्ता आहेत. कोळशाच्या ढीगार्याखाली अनेक कामगार अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ही दुर्घटना नैसर्गिक नाही. ती मानवी चुकांमुळेच झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती दलाचे जय प्रकाश यांनी कोलकाता येथील एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. २०१२ मध्येही या ठिकाणी कोळसा खाणीत दुर्घटना घडली होती. यावेळी ३ कामगारांचा मृत्यू झाला होता.देशातील २९ टक्के कोळसा खाणी या झारखंड राज्यात आहेत.
हेही वाचलं का?