Mexico | मध्य मेक्सिकोत शेतकरी आणि गँगस्टर्स यांच्यात धुमश्चक्री, ११ ठार

Mexico | मध्य मेक्सिकोत शेतकरी आणि गँगस्टर्स यांच्यात धुमश्चक्री, ११ ठार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मध्य मेक्सिकोतील (Mexico) एका गावात गुंडांची टोळी आणि गावकरी यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य मेक्सिकोमधील गुन्हेगारी टोळीतील बंदूकधारी आणि शेतकऱ्यांच्या एका गटात शुक्रवारी ही धुमश्चक्री झाली होती. यात ११ लोक ठार झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये काउबॉय टोपी घातलेले शेतकरी रायफल्स घेऊन संशयित टोळी सदस्यांचा पाठलाग करताना दिसत आहे. यादरम्यान गोळीबारही सुरु आहे. येथे जोरदार धुमश्चक्री दिसून आली आहे.

मेक्सिको राज्याच्या पोलिसांनी सांगितले की, मेक्सिको शहरापासून दूर असलेल्या टेक्सकॅल्टिट्लान गावात ही चकमक झाली. हे गाव राजधानीच्या नैऋत्येस सुमारे १३० किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी सांगितले की मृतांमध्ये ८ गुन्हेगार टोळीचे सदस्य, तर ३ गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारी टोळीची ओळख पटलेली नाही. पण हिंसक फॅमिलिया मिचोआकाना ड्रग कार्टेल एक दशकापासून या भागात वर्चस्व गाजवत आहे.

स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे की फॅमिलिया मिचोआकाना टोळीतील बंदुकधारी गुंड गावात आले होते आणि स्थानिक शेतकर्‍यांकडे त्यांनी प्रति एकर खंडणी रक्कम देण्याची मागणी केली होती. याबाबत अधिकाऱ्यांनी पुढे काही अधिक माहिती दिलेली नाही.

मेक्सिकोमधील (Mexico) ड्रग कार्टेल्स हे कोणत्याही कायदेशीर अथवा बेकायदेशीर व्यवसायातून खंडणी उकळण्यासाठी ओळखले जातात आणि पैसे देण्यास नकार देणार्‍या रँचेस, फार्म अथवा स्टोअरवर हल्ला करतात. तसेच ते जाळपोळही करतात.

फॅमिलिया मिचोआकाना हे पोलिसांवरही हल्ले करतात. शेजारच्या ग्युरेरो राज्यातील टोटोलापन शहरात २०२२ मध्ये त्यांनी २० लोकांची हत्या केली होती. या हल्ल्यात शहराचे महापौर, त्यांचे वडील आणि इतर १८ जणांचा समावेश होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news