Rajesh Tope : आराेग्‍यमंत्री म्हणाले, एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास 'त्या' वर्गाला तात्काळ सुट्टी दिली पाहिजे. | पुढारी

Rajesh Tope : आराेग्‍यमंत्री म्हणाले, एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास 'त्या' वर्गाला तात्काळ सुट्टी दिली पाहिजे.

जालना ;पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळा सुरू करण्या संदर्भात शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करा मात्र संसर्ग वाढायला नको, यासाठी अधिकाऱ्यांनी काळजी घेऊन दक्ष राहिले पाहिजे,  अशा सूचना देखील दिल्या आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनान निर्णय असले तरी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास त्या वर्गाला तात्काळ सुट्टी दिली पाहिजे. असे राज्‍याचे आराेग्‍यमंत्री राजेश टाेपे यांनी स्‍पष्‍ट केले. जालना येथे ते पत्रकारांशी बोलत हाेते.

यावेळी टाेपे म्‍हणाले की, राज्यात लसीकरण ९० टक्के झाले असून दुसरी लस घेणाऱ्यांचे ६२ टक्के प्रमाण झाले आहे. लसीकरण सक्तीने नाही मात्र दुसरी लस घेण्यासाठी नागरिकांना विनंती करून घेण्यासाठी भाग पाडू.

Rajesh Tope : रुग्‍णसंख्‍या कमी असल्‍यास निर्बंध हाेणार कमी

शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि कोरोना संसर्ग पण वाढू नये याची सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात कुठेही रुग्णाची संख्या कमी झाल्यास तेथील निर्बंध कमी करण्यात येणार आहे, असेही टाेपे यांनी स्‍पष्‍ट केले.  मुलांना शाळेत पाठवण्या संदर्भात पालकांचा विरोध होत असला तरी शाळामध्ये मुलांना पाठवले पाहिजे अशी पालकांना विनंती केली आहे. शासनाने सर्व बाजूने काळजी घेतली असून शिक्षण संस्थांनी पण कोरोना नियमांचे नियम पाळण्याचे मान्य करून त्यापद्धतीने सूचना केल्या आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

युरोपमध्ये चौथी लाट आली तरी शाळा सुरू आहेत. मुलांच्यादृष्टी कोनातून शाळा सुरू झाल्या पाहिजेत. लसीकरण करा असा केंद्राचा सुरुवातीपासून आग्रह आहे. त्यामुळे राज्यात सध्या पहिली लस घेणाऱ्यांची संख्या ९० टक्के झाली असून दुसरी लस घेणाऱ्यांचे ६२ टक्के प्रमाण झाले आहे.लसीकरण सक्तीने नाही तर दुसरी लस घेण्यासाठी नागरिकांना समजून सांगणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button