राज्यातील १० देवस्थानाच्या जमिनीत घोटाळा : नवाब मलिक

राज्यातील १० देवस्थानाच्या जमिनीत घोटाळा : नवाब मलिक

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून राज्यभरात ११ तक्रारी आल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी नमूद केले. हिंदू देवस्थानाच्या ३०० एकर जमिनी बळकावण्याचं कारस्थान झालंय. राज्यभरात देवस्थानाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मलिक म्हणाले, वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून राज्यभरात ज्या ११ तक्रारी आल्या होत्या. त्यातील पहिली तक्रार नांदेडमध्ये केली गेली. वफ्फ बोर्डाच्या २१३ एकर जमीन आहे. काही ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने धार्मिक स्थळांच्या जमिनी बळकावल्या. हिंदू देवस्थानाच्या ३०० एकर जमिनी बळकावण्याचं कारस्थान आहे. राज्यभरात देवस्थानाच्या जमिनी बळकावण्याचा उद्योग सुरू आहे. एसआयटीकडून २ एफआयआर दाखल झाले आहेत. राज्यातील १० देवस्थानाच्या जमिनीत घोटाळा झालाय. तक्रारीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news