‘ओलिसांना सोडा, ही ‘शेवटची संधी’ : इस्रायलचा हमासला निर्वाणीचा इशारा
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास युद्ध अधिक तीव्र होत आहे. राफाह हल्ल्यापूर्वी इस्रायलने ओलिस नागरिकांच्या सुटकेसाठी करार करण्याची शेवटची संधी दिली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि.२६ एप्रिल) तेल अवीवमध्ये इजिप्शियन आणि इस्रायली प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. पॅलेस्टिनी संघटना हमासवर ओलिसांच्या सुटकेसाठी करार करण्यासाठी दबाव आणण्यासाठी इजिप्शियन शिष्टमंडळ तयार असल्याचे इस्त्रायलला वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इस्त्रायल'ने दिले आहे. तसेच ओलिसांच्या सुटकेबाबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे वृत्त अल-काहिरा' न्यूजने दिले आहे.
रफाह शहरावरील हल्ला थांबवण्यासाठी ओलिसांच्या कराराला हमास विलंब करू देणार नाही, असा विश्वास इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. इस्रायलने ओलीस कराराच्या माध्यमातून युद्धविरामाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.
'इस्त्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड रफाहात लपलाय'
हमासकडे अजूनही शेवटची संधी आहे. इस्त्रायल रफाहमध्ये हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लष्कराने काही दिवसांपूर्वी आणखी दोन राखीव दल सज्ज केली होती. हमासचा म्होरक्या अल-सिनवार हा गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये झालेल्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड मानला जातो. या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली सैनिक आणि नागरिक मारले गेले आणि गाझामध्ये 200 हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले होते. अल-सिनवर हा रफाहा शहरातील बोगद्यांमध्ये लपला असल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.
ओलिसांच्या सुटकेसाठी नवा करार हाेण्याची शक्यता
इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इजिप्शियन आणि इस्रायली प्रतिनिधींमधील नवीन चर्चा हमासशी ओलिसांच्या सुटकेवर लक्ष केंद्रित करण्याचा हेतू होता. नवीन करारनुसार काही महिला, वृद्ध आणि आजारी ओलीस सोडले जातील. अशा ४०0 अपहृत लोकांना सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव हमासने फेटाळला होता. त्यांच्या मते, या श्रेणींमध्ये मोडणारे बरेच ओलीस जिवंत राहिलेले नाहीत. हमास गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी करत आहे, जो इस्रायल सरकार फेटाळत आहे.
रफाहवर हल्ला करण्यासाठी इस्त्रायल सज्ज
इस्त्रायलने रफाह शहर ताब्यात घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. आता सरकारची मान्यता मिळताच इस्त्रायल सैन्य ऑपरेशन सुरू करण्याचाही तयारीत आहे. इस्रायल गाझामधील रफाहवर हल्ला करण्यासाठी पुढे जाईल, जिथे इस्रायली सैन्य अद्याप पोहोचलेले नाही, असे काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले होते. आता नेतन्याहू यांच्या सरकारच्या प्रवक्त्याचे म्हटलं आहे की, इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्यापूर्वी रफाह येथून पॅलेस्टिनींना स्थलांतरित करण्यासाठी 40,000 तंबू खरेदी केले होते, प्रत्येक तंबूमध्ये 10 ते 12 लोक बसण्याची क्षमता आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनीही इस्रायलला रफाह शहरावर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
- इस्रायलबराेबरील कराराला विरोध : गुगलने केली २८ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
- Israel Iran Tension : 'आमच्याकडे पर्यायच नव्हता', इराणचे इस्रायलवरील हल्ल्यानंतर सुरक्षा परिषदेत स्पष्टीकरण
- Israel attacks Iran | हल्ल्याचा बदला! इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रे डागली, इस्फहान प्रांतात अनेक स्फोट, दुबई- इराण विमान सेवा रद्द

