Lamberghini Girl हर्षदा विजय तापसीसोबत झळकणार

Lamberghini Girl हर्षदा विजय तापसीसोबत झळकणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : Lamberghini चलायी जाने ओ, हे गाणं तुम्ही आजही ऐकत असाल. हे गाणं पंजाबी आहे. संगीत आणि त्यातील कलाकारांचा अभिनय यामुळे ते गाणं भारतभरात डोक्यावर घेतलं गेलं. यात मराठमोळी मॉडेल हर्षदा विजय हिचा लीड रोल होता. आता Lamberghini Girl हर्षदा विजय तापसीसोबत झळकणार आहे.

अधिक वाचा- 

या गाण्यानंतर हर्षदा फार कमी वेळा प्रेक्षकांच्या समोर आली. आता हर्षदा पुन्हा एकदा स्क्रीनवर झळकत आहे.

अधिक वाचा- 

हर्षदा बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा स्क्रीनवर झळकत आहे. तापसी पन्नू, विजय सेतुपती यांच्यासमेवत अनाबेल सेतुपती या सिनेमात ती झळकत आहे. हा सिनेमा १७ सप्टेंबरला डिझने हॉटस्टारवर रिलिज होत आहे.

हर्षदाने यापूर्वी विठ्ठल या मराठी चित्रपटात काम केलं होतं. हर्षदा विजयची ओळख आजही Lamberghini Girl अशीच आहे.

अधिक वाचा- 

Lamberghini हे पंजाबी गाणं काही वर्षांपूर्वी रिलिज झाले होते. हे गाणं देशभरात सुपरहिट झाले होते. आजही हे गाणं मोठ्या आवडीने पाहिलं जातं. या गाण्यानंतर हर्षदाने अगदी निवडक असे प्रोजेक्टच करण्याचा निर्णय घेतला होता.

अधिक वाचा- 

"Lamberghini हे गाणं इतक गाजलं की दुसरा प्रोजेक्ट करताना फार काळजी घेणं आवश्यक होतं. चाहत्यांच्या अपेक्षा इतक्या वाढल्यानंतर दुसरा प्रोजेक्टही त्यांच्या अपेक्षापूर्ती करणाराच हवा होता. त्यामुळे समोर आलेला कोणताही प्रोजेक्ट हाती घे, असं मी करू शकत नव्हते," अशी प्रतिक्रिया तिने दिलेली आहे.

हर्षदाने अनाबेल सेतुपतीचं पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे, पण यात तिचा नेमका रोल काय आहे, याबद्दल तिने काही माहिती दिलेली नाही.

हेदेखील वाचा –

पाहा व्हिडिओ- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news