कोरेगाव पार्कचा पारा 42.1 अंशांवर; पुणेकर उकाड्याने हैराण

कोरेगाव पार्कचा पारा 42.1 अंशांवर; पुणेकर उकाड्याने हैराण
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव पार्कचा पारा गुरुवारी पुन्हा 42.1 अंशांवर गेला होता. दिवसभर पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते.
गेल्या आठ दिवसांत शहरातील तापमानात चढ-उतार झाला. कमाल तापमानाचा पारा 40 वरून 37 अंशांवर खाली आला होता. मात्र, बुधवारपासून पुन्हा पारा 40 अंशांवर गेला. गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी पारा 40 अंशांवर गेल्याने शहरात कमालीचा उकाडा जाणवत होता. कोरेगाव पार्कचा पारा पुन्हा 42.1 अंशांवर गेला.

गुरुवारचे तापमान

कोरेगाव पार्क 42.1, शिवाजीनगर 39.5, वडगावशेरी 41.2, मगरपट्टा 40.8, लवळे 40.8, चिंचवड 40.6, आंबेगाव 40.2, हडपसर 40, पाषाण 39.9, बालेवाडी 39.9

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news